माथेरानची मिनीट्रेन सात महिन्यांत येणार रुळावर !
By admin | Published: December 24, 2016 03:22 AM2016-12-24T03:22:40+5:302016-12-24T03:22:40+5:30
सात महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रुळावरून धावण्याची चिन्हे दिसत आहेत. १ मे व ८ मे रोजी झालेल्या
माथेरान : सात महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रुळावरून धावण्याची चिन्हे दिसत आहेत. १ मे व ८ मे रोजी झालेल्या किरकोळ अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी मिनीट्रेन बंदची घोषणा केली आणि सात महिन्यांनंतर मिनीट्रेन सुरू होणार यामुळे माथेरानच्या नागरिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
माथेरान मिनीट्रेन सुरू होण्यासाठी सर्वपक्षीय मंडळींनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे कैफियत मांडली व त्याला प्रभूंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरात लवकर एअर ब्रेक प्रणालीची मिनीट्रेन माथेरानमध्ये धावेल, असे सूतोवाच के ले.या अनुषंगाने २२ डिसेंबरला गुरु वारी खास माथेरानसाठी एअर ब्रेक प्रणालीची दोन इंजिने ४०१ आणि ४०२ ही नेरळमधील लोको शेड येथे दाखल झाली. यावर माथेरानच्या लोकांना विश्वास बसत नव्हता म्हणून माथेरानकर स्वत: नेरळ येथे ही दोन इंजिने पाहण्यासाठी गेले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शुक्र वारी रेल्वे प्रशासनाचे डी.आर.एम. जी.एस. गोयल यांनी माथेरानमध्ये येऊन अपघात घडलेल्या स्थळाची पाहणी केली. त्यामुळे सध्या येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे १७ जानेवारीपर्यंत ही माथेरानची राणी डौलात धावेल, असा विश्वास रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)