शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

नवी मुंबईचे महापौरपद महिलांसाठी ‘खुले’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 1:42 AM

नवी मुंबई शहराचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : नवी मुंबई शहराचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे अनेकांचे महापौरपदाचेस्वप्न धुळीस मिळाले आहे. तर सहा महिन्यांनंतर होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेविकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यानुसार राजकीय पक्षांतील नेत्यांनी आगामी महापौरपदाच्या दृष्टीने आपल्याच घरापासून चाचपणी सुरू केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशानंतर शहरातील राजकीय गणिते बदलली आहेत. नाईक यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक भाजपात दाखल झाल्याने महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. या धामधुमीत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्यासह काँग्रेसचे काही नगरसेवक व पदाधिकारीही भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांनी येऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत महापौर पदासाठी खºया अर्थाने चुरस पाहायला मिळणार आहे. सध्या महापालिकेत १११ नगरसेवक आहेत. यात ५८ नगसेविका आहेत. विशेष म्हणजे, ५० टक्के आरक्षणानुसार ५६ महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तर दोन महिला खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत नगरसेविकांची संख्या ५८ इतकी झाली आहे. प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक नगरसेविकांनी पत्नी, भावजय किंवा आपल्या मुलीला नगरसेविका म्हणून सभागृहात पाठविले आहे. आता नवी मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने मागील अनेक वर्षांपासून महापौरपदाची आस बाळगून असलेल्या आजी-माजी नगरसेवकांची निराशा झाली आहे. असे असले तरी आगामी महापौरपदाच्या पार्श्वभूमीवर खुल्या प्रवर्गातील प्रमुख पक्षांच्या आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.>भाजपची लागणार कसोटीनवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे भाजपचे दोन आमदार आहेत. या दोन्ही आमदारांतील सख्य सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीत असताना एकहाती निर्णय घेणारे गणेश नाईक यांना भाजपात ते स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीतच भाजपची कसोटी लागणार आहे.>शिवसेनेतील सुंदोपसुंदीनवी मुंबईतील शिवसेनेला गटातटाने पोखरले आहे. उपनेते विजय नाहटा आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यातील सुप्त संघर्षाचा फटका सर्वसामान्य शिवसैनिकांना बसताना दिसत आहे. राज्यातील सध्याचे चित्र पाहता सत्ता नक्की कोणाची येईल, याबाबत भाष्य करणे धाडसाचे ठरणारे आहे.>२५ वर्षांतीलमहिला महापौरसुषमा दंडे(शिवसेना) : १९९६विजया म्हात्रे(राष्ट्रवादी): १९८८मनीषा भोईर(राष्ट्रवादी): २००५अंजनी भोईर(राष्ट्रवादी): २००७

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई