गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा महापौरांनी घेतला आढावा
By admin | Published: August 18, 2015 03:06 AM2015-08-18T03:06:37+5:302015-08-18T03:06:37+5:30
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारीचा श्रीगणेशा केला आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी नवी मुंबईचे
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारीचा श्रीगणेशा केला आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सोमवारी पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. यावेळी महापालिका अधिकारी उपस्थित होते. मागील वर्षी आलेल्या अडचणींवर यंदा मात करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुरेपूर पालन करून गणेशोत्सव मंडळांनी सर्वात प्रथम पोलीस विभागाचे ना हरकत पत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार विभाग कार्यालयामार्फत संबंधित मंडळांना आवश्यक कागदपत्रे देण्यात आल्यानंतर लवकरात लवकर परवानगीपत्रे देण्यात यावीत असे निर्देश महापौरांनी दिले. यावेळी महानगरपालिकेतील सर्वच विभागांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थित पार पडावी, अशी सूचना महापौरांनी दिली. आयुक्तांसह महापौर स्वत: विसर्जनाच्या ठिकाणांची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी या बैठकीत दिली. (प्रतिनिधी)