वैभव गायकरपनवेल : वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे; परंतु पनवेलमध्ये नियम धाब्यावर बसवून घातक वैद्यकीय कचरा रोडवर टाकला जात आहे. लाइनआळीमधील केतकी हॉटेल परिसरामध्ये दोन दिवसांपासून रोडवर वैद्यकीय कचरा टाकला असून, सुईमुळे साफसफाई कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.
लाइनआळीमधील घनकचरा उचलण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयाला मंगळवारी कचºयातील सुईमुळे जखम झाली. यामुळे येथील कचरा उचलण्यात आला नाही. यामुळे सीताराम धोत्रे या कर्मचाºयाची प्रकृतीही बिघडली आहे. बुधवारी पुन्हा याच ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वास्तविक वैद्यकीय कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कंपनी या एजन्सीमार्फत हे काम केले जाते, त्यामुळे वैद्यकीय टाकाऊ औषधांचा जैविक कचरा कुठेही टाकू नये, याविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वारंवार मार्गदर्शन केले जाते. मात्र, त्यानंतरही असे
प्रकार आढळत असल्याने कठोर कारवाईची गरज आहे. अशाप्रकारे कचरा रस्त्यावर टाकण्याचे प्रकार सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हा कचरा कोण टाकतो, याबाबत अद्याप कोणाचेही नाव पुढे आले नाही.
बायोमेडिकल वेस्ट (जैविक) कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सोबत रजिस्ट्रेशन केले होते. संबंधित कंपनीची गाडी येऊन हा जैविक कचरा गोळा करते. संबंधित कचºयावर प्रक्रि या करून त्याची विल्हेवाट लावली जाते. जैविक कचºयातील इंजेक्शन रु ग्णांना टोचलेले असते. अशा वेळी उघड्यावर टाकलेल्या या इंजेक्शनमुळे या कचऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. कोणत्याही घातक आजाराची लागण या कचºयापासून होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या प्रकारावर आळा बसणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
खांदा वसाहतीमध्येही कचराऑक्टोबर २०१८ मध्ये खांदा वसाहतीमध्ये वैद्यकीय कचरा रोडवर टाकल्याची घटना निदर्शनास आली होती. दक्ष नागरिकांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आरोग्य विभागाने कचरा कोणी टाकला याची चौकशी सुरू केली होती. रोडवर वैद्यकीय कचरा टाकल्याचे उघड झाल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली होती.
कामोठेमध्येही घटनाकामोठे वसाहतीमध्ये मानसरोवर रेल्वेस्टेशनकडे जाणाºया रोडवर मोकळ्या भूखंडावरही अशाप्रकारचा कचरा नोव्हेंबर २०१८ मध्ये आढळून आला होता. खांदा वसाहतीमधील शिवाजी चौकातील पदपथावरही त्याच दरम्यान वैद्यकीय कचरा आढळून आला होता.रुग्णालयाच्या आवारात कचरा
ऑक्टोबर २०१८ मध्येच पनवेलमधील एका रुग्णालयाच्या समोरील कचराकुंडीमध्ये सलाइनच्या बाटल्या, टॅबलेटचे पॅकेट, इंजेक्शनच्या सुई व इतर साठा आढळून आला होता. पनवेलमध्ये वारंवार अशाप्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
अशाप्रकारे उघड्यावर जैविक कचरा टाकणे, हा गुन्हा आहे. या संदर्भात पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल. वैद्यकीय टाकाऊ औषधे आणि साहित्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट विशेष सुविधा आहे. संबंधित कंपनीची गाडी येऊन हा कचरा गोळा केला जातो. -डॉ. रमेश निकम, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका