पाणीयोजनांमुळे गाजली कर्जतची सभा

By admin | Published: April 1, 2017 11:47 PM2017-04-01T23:47:05+5:302017-04-01T23:47:05+5:30

नगरपरिषद सर्वसाधारण सभा शुक्रवारी संपन्न झाली. सभेत कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीयोजना, मोहिनीकुंज इमारतीमधील

A meeting of Karjat Sabha due to water schemes | पाणीयोजनांमुळे गाजली कर्जतची सभा

पाणीयोजनांमुळे गाजली कर्जतची सभा

Next

कर्जत : नगरपरिषद सर्वसाधारण सभा शुक्रवारी संपन्न झाली. सभेत कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीयोजना, मोहिनीकुंज इमारतीमधील अनधिकृत बांधकाम आणि सार्वजनिक शौचालय साफसफाई आदी विषयांवर गाजली. या वेळी विकासकामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. काही कामाच्या निविदाच न आल्याने त्या पुन्हा काढण्याचे ठरविण्यात आले.
नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गटनेते राजेश लाड, उपनगराध्यक्षा अर्चना बैलमारे, विरोधी पक्षनेत्या यमुताई विचारे, लालधारी पाल, उमेश गायकवाड, मिलिंद चिखलकर, शीतल लाड, अश्विनी दिघे, सई वारे, सोमनाथ ठोंबरे, नितीन सावंत, संतोष बैलमारे, अशोक ओसवाल, सुवर्णा जोशी, अरुणा वायकर, बिनीता घुमरे, मुकेश पाटील, अरविंद मोरे, मुख्याधिकारी दादाराव अटकोरे उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आल्यावर नगरसेविका सुवर्णा जोशी यांनी समाधान व्यक्त केले.
शहरात काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळत आहे, त्यामुळे झोनिंग करण्याबाबत चर्चा झाल्यावर मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी टेक्निकल अभियंत्याची गरज असून, जीवन प्राधिकरणाकडे मागणी केल्याचे सांगितले. पाणीचर्चेत सुवर्णा जोशी, नितीन सावंत, बिनीता घुमरे, राजेश लाड, लालधारी पाल, मिलिंद चिखलकर, सोमनाथ पालकर यांनी भाग घेतला.
विषयपत्रिकेवर पाच नंबर विषयात २०१७-१८मधील विविध कामांसाठी वार्षिक ठेकेदाराची नेमणूक करावी, यावर नगरसेवक संतोष पाटील यांनी ठेकेदारांची नेमणूक का करता? असा प्रश्न उपस्थित करून मुद्रे गावात मोहिनीकुंज इमारतीमध्ये पाच गाळ्यांना मंजुरी असताना संबंधित ठेकेदाराने २२ ते २३ गाळे बांधले आहेत. याबाबत सर्वसाधारण सभेत विषय झाला, तरी नगरपरिषद प्रशासन यावर गप्प का बसले आहे? अनधिकृत गाळ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर स्थापत्य अभियंता नीलेश चौडीये यांनी पुनर्आराखडा तयार तयार केल्याचे सांगितले.
इमारतीच्या चर्चेत संतोष पाटील, अरविंद मोरे, नितीन सावंत, बिनीता घुमरे यांनी भाग घेतला. मात्र, मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांच्यात शाब्दिक वाद झाले. नीलेश चौडीये यांनी एक महिन्यात त्यावर कारवाई करतो, असे सांगितल्याने वातावरण निवळले. नगरपरिषद कार्यालयाच्या समोरच्या इमारतीला पार्किंग नाही. त्याकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे, तर त्या मोहिनीकुंजमधील रहिवाशांना नगरपरिषद प्रशासन काय न्याय देणार?असा प्रश्न अरविंद मोरे यांनी उपस्थित केला.
नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय नियमित स्वच्छ केली जात नसल्याचा प्रश्न संतोष पाटील यांनी उपस्थित केला. दिवसातून चार वेळा स्वच्छता करण्याचे ठरवले असताना, ठेकेदाराचा माणूस दिवसातून एकदाच स्वच्छता करीत असल्याचे नितीन सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बिलात कपात करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
खासदार श्रीरंग बारणे नदी संवर्धन फंडातून निधी देणार असून, दोन्ही निधीतून या ठिकाणी सुशोभिकरण, गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, जॉगिंग ट्रक आदी कामे आवश्यक असून तसे नियोजन करावे असे सांगून, तसेच शनी मंदिरच्या परिसरात उद्यान करण्याची मागणी केली. भिसेंगाव येथील सर्व्हे नंबर ५२ या जमिनीवरील आरक्षण बदलून रहिवासी विभागात करण्याबाबतचा विषय आल्यावर मुख्याधिकारी अटकोरे यांनी या जमिनीवरील हिल झोन उठवायच्या कामी सभागृहाचा ठराव आवश्यक आहे. त्यावर यमुताई विचारे यांनी हरकत घेतली. त्यावर नितीन सावंत, राजेश लाड, लालाधारी पाल, बिनीता घुमरे यांनी चर्चा केली. (वार्ताहर)

Web Title: A meeting of Karjat Sabha due to water schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.