शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पनवेलमध्ये साकारतेय मेगाकिचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 2:29 AM

संडे अँकर । दहा हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी मिळणार आहार

वैभव गायकर

पनवेल : महानगरपालिका व अक्षयपात्र फाउंडेशनच्या संयुक्त सहकार्यातून शहरातील साईनगर परिसरात मेगाकिचन उभारणीचे काम सुरू आहे. सुमारे दोन हजार चौरस फूट जागेत तळमजला अधिक तीन मजले, अशा भव्य क्षेत्रात हे मेगाकिचन आकार घेत आहे. या माध्यमातून दररोज दहा हजार विद्यार्थ्यांना पुरेल एवढा पोषक आहार या ठिकाणी तयार केला जाणार आहे. अक्षयपात्र संस्था महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पोषक आहाराचे वाटप करणार आहेत.

शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योनजेनेमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन महानगरपालिकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पनवेलसह नवीन मुंबई व कोल्हापूर महानगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या मेगाकिचनचे काम जोरात सुरू आहे. या प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च अक्षयपात्र फाउंडेशन ही संस्था उचलणार आहे, याकरिता पालिकेने या संस्थेकडून प्रतिवर्ष नाममात्र भाडे आकारून हे भूखंड दिले आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याच्या प्रधान सचिवांचे आयुक्तांना पत्र आले होते. त्यानुसार १९ नोव्हेंबर २०१८ रोजी पालिकेच्या महासभेत ठराव करून तो अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या प्रधानसचिवांना पाठविला होता. ४ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका व अक्षयपात्र फाउंडेशन यांच्यामध्ये ३० वर्षांचा करार झाला आहे. सध्याच्या घडीला पनवेल महानगरपालिकेच्या दहा शाळा यांची पटसंख्या १,८९६ च्या घरात आहे. तर पालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांची पटसंख्या ८,६९४ इतकी आहे. ही पटसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमावली २०१५ अंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अक्षयपात्र संस्थेने पुढाकार घेतला आहे. पालिकेला कोणताही खर्च येणार नाही. देशभरात अक्षयपात्र संस्थेचे अशाच प्रकारे एकूण ५२ ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. पनवेल शहरातील साईनगरमधील तीन मजली इमारतीत मध्यान्ह पोषण आहार बनविण्याचे काम चालणार आहे. तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. या वर्षीच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवातही होईल, अशी आशा आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे.अक्षयपात्र या संस्थेच्या पुढाकाराने पालिका क्षेत्रातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत मध्यान्ह प्राप्त होणार आहे, याकरिता पालिकेला कोणताही अतिरिक्त खर्च होणार नसून पनवेल शहरात सुरू असलेले मेगाकिचन उभारणीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई