शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, पुढच्याच आठवड्यात संसदेत सादर करण्याची तयारी
2
PM मोदींचा देवेंद्र फडणवीसांना 'कानमंत्र'; मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट
3
गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं
4
सावधान! Bleeding Eye व्हायरस म्हणजे काय? ८ दिवसांत होतो रुग्णाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं
5
“बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा”: नाना पटोले
6
नागा-शोभितानंतर आता साउथच्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
7
खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल
8
"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी
9
'आप'लाही आता 'बहिणी' झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा
10
हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...
11
अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान
12
"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
13
मार्गशीर्ष पौर्णिमा: अत्यंत शुभ योगात लक्ष्मी कृपेसाठी ‘ही’ ३ कामे अवश्य करा; भरभराट होईल!
14
डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, पण आशा सोडली नाही; ४ महिन्यांत क्रॅक केली UPSC, झाली IAS
15
Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा
16
शुक्र-शनी युती: ७ राशींना अपार लाभ, नवीन नोकरीची ऑफर; शेअर बाजारात नफा, वरदान काळ!
17
BLOG: हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी
18
Ajit Pawar :- वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचं सूचक विधान
19
आधी लेग ब्रेक, मग पकडला वेग! नेट्समध्ये अगदी नेटानं गोलंदाजी करताना दिसला बुमराह (VIDEO)
20
आईची हत्या, ६ दिवस मृतदेह घरात, वडील येताच...; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने सर्वांनाच मोठा धक्का

‘मेमू’ सेवेला दुहेरी मार्गाचा अडसर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 2:22 AM

पुणे गाठण्यासाठी आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बरवासीयांची गैरसोय थांबविण्यासाठी मार्च २0१४ पर्यंत एलटीटी-पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करीत होते

विजय मांडे, कर्जतपुणे गाठण्यासाठी आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बरवासीयांची गैरसोय थांबविण्यासाठी मार्च २0१४ पर्यंत एलटीटी-पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करीत होते. ही सेवा सुरू झाल्यास हार्बर, ट्रान्स हार्बर प्रवाशांना दिलासा मिळणार होता. परंतु पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग झाल्याशिवाय हा मेमूचा (मेनलाइन इलेक्ट्रॉनिक मल्टीपल युनिट) प्रकल्प पुढे सरकणार नाही, असे त्यावेळेचे मध्य रेल्वे व्यवस्थापकांनी स्पष्ट केले होते. सध्या काही एक्स्प्रेस गाड्यांसह लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्याही या मार्गावरून दररोज जातात मग मेमू सेवा का धावणार नाही, असा संतप्त सवाल कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी पंकज मांगीलाल ओसवाल यांनी उपस्थित केला आहे.पुण्याकडे जाण्यासाठी नवी मुंबई, पनवेलकरांना रस्ते वाहतुकीचा वापर करावा लागतो. मध्य रेल्वेकडून तर प्रगती एक्स्प्रेसला पनवेल आणि कर्जतवरून वळसा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे एलटीटी ते शिवाजीनगर पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून युध्दपातळीवर करण्यात येत होता. कुर्ला ते शिवाजीनगर अंतर १७0 किलोमीटर आहे. ही सेवा सुरू केल्याने वाशी, बेलापूर, पनवेल, कर्जत, लोणावळा स्थानकावर या गाडीला थांबा देण्याचा विचार केला जात होता. या मार्गावरून १२ डबा किंवा जास्तीत जास्त १६ डब्यापर्यंतच्या गाड्या चालविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत होते. ही सेवा सुरू झाल्यास शिवाजीनगरपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना पावणेतीन तास लागणार होते. सध्या मुंबई-पुणे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना तीन ते साडेतीन तास लागतात. पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग दुहेरी झाल्याशिवाय मेमू प्रकल्प सुरू करता येणार नाही, असे मध्य रेल्वेचे तत्कालीन व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. पनवेल-कर्जत या मार्गाचे दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव असून तो पूर्ण झाल्याशिवाय कुर्ला ते शिवाजीनगर पुणे अशी मेमू गाडी धावू शकणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.