शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती; चार वर्षांत केवळ ३३ शस्त्रक्रिया, महिलांच्या मात्र ८,४७६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:46 AM

जनजागृतीची गरज : अनेक गैरसमज असल्याने पुरुषांमध्ये उदासीनतेमुळे संख्या कमी

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नसबंदी केल्याने अशक्तपणा येतो तसेच पुरुषत्वावर परिणाम होतो अशा प्रकारचे विविध गैरसमज समाजात पसरलेले आहेत. गैरसमज आणि भीतीमुळे कुटुंबनियोजन शस्रक्रियेसाठी पुरुषांचे प्रमाण कमी असून, कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही महिलांवरच आहे. नवी मुंबई शहरात गेल्या चार वर्षात केवळ ३३ पुरुषांनी, तर ८४७६ महिलांनी कुटुंबनियोजनाची शस्रक्रिया केली आहे. त्यामुळे शस्रक्रियेबाबत केली जाणारी जनजागृती आणखी तीव्र व्हायला हवी, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.कुटुंबनियोजनसाठी शासनामार्फत मोहीम राबविली जाते. नागरिकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी जनजागृती केली जात असून, शासनातर्फे शस्रक्रिया करणाऱ्यांना अनुदान  देण्यात येते. शस्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज असल्याने कुटुंबनियोजन शस्रक्रिया फक्त स्रियांनीच करावी, असा समज असून, नवी मुंबई शहरात पुरुष नसबंदीचे प्रमाण आजही नगण्यच आहे. नवी मुंबई शहरात २०१७-१८ या वर्षात दोन हजार ६९९ महिलांनी, तर १० पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. २०१८-१९ या वर्षात दोन हजार ७५५ महिलांनी, तर १५ पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. २०१९-२० या वर्षात दोन हजार ५४८ महिलांनी, तर केवळ सहा पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन होता. त्यामुळे रुग्णालयातील इतर कामांवर त्याचा परिणाम झाला होता. २०२०-२१ या वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत ४७४ महिलांनी तर फक्त दोन पुरुषांनी कुटुंबनियोजनाची शस्रक्रिया केली.हे आहेत गैरसमजकुटुंबनियोजन शस्रक्रिया केल्यास कमजोरी येईल त्यामुळे काम करता येणार नाही, नपुंसकत्व येईल,  ही शस्रक्रिया करण्याची जबाबदारी महिलांचीच आहे. अशा विविध भीती आणि गैरसमजांमुळे पुरुष शस्रक्रिया करणे टाळत असून, शस्रक्रिया करण्यासाठी महिलांना भाग पाडले जाते.कुटुंबनियोजनाबाबत आजही विविध गैरसमज आहेत. त्यामुळे या शस्रक्रियेसाठी महिलांकडे पाहिजे जाते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येणारी जनजागृती व्यापक व्हायला हवी. - सचिन गोळे, नागरिककुटुंबनियोजन शस्रक्रिया केल्यावर कमजोरी येते तसेच पुरुषत्व संपते यासारखे अनेक गैरसमज नागरिकांमध्ये आहेत. पुरुषांना याबाबत योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन व्हायला हवे. यासाठी जनजागृतीची मोहीम तीव्र होणे गरजेचे आहे.- किशोर पवार, नागरिककुटुंबनियोजन शस्रक्रिया करण्याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. कुटुंबातील कमावती व्यक्ती पुरुष असल्याने त्यांची शस्रक्रिया केल्यास त्यांना त्रास होऊ शकतो, अशी काही महिलांचीच मानसिकता असल्याने या शस्रक्रियेसाठी महिलाच पुढाकार घेतात. कुटुंब नियोजनासाठी महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जाते गैरसमज दूर करून पुरुषांनीदेखील यासाठी पुढे आलं पाहिजे.- डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, न. मुं. म.पा.