लघुपटांतून युवकांनी दिला स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:28 AM2020-01-16T00:28:20+5:302020-01-16T00:28:29+5:30
महापालिकेची स्पर्धा : अनिडस्ट्रॉएबलने पटकाविला प्रथम क्र मांक
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेच्या विविध विषयांवर लघुपट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या लघुपटातून युवकांनी स्वच्छतेचा संदेश दिला. ५२ लघुपटांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अनिडस्ट्रॉएबल या लघुपटाने प्रथम क्र मांक पटकाविला.
महापालिकेच्या लघुपट स्पर्धेत ५२ लघुपटांनी सहभाग नोंदविला. त्यामधील दहा लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. लघुपट स्पर्धेत अनिडस्ट्रॉएबल हा लघुपट प्रथम क्र मांक, भविष्य या लघुपटाने द्वितीय क्र मांक आणि धप्पा या लघुपटाने तृतीय क्र मांकाचे पारितोषिक पटकाविले. स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना मनापासून पटले असून स्वच्छता ही सवय व्हावी, या दृष्टीने स्वच्छतेचा संदेश लघुपटासारख्या मनोरंजक माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्र म ५२ लघुपटांनी सहभागी होत यशस्वी केला असून, याद्वारे युवकांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळत असल्याचा आनंद महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वच्छता ही प्रत्येकाने करावयाची गोष्ट असून सामूहिक सहभागातूनच यश मिळू शकते, असे सांगत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये पहिल्या सहामाहीच्या सर्वेक्षणात नवी मुंबई देशात तिसऱ्या क्र मांकावर निर्देशित असल्याचे सांगितले. स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी, नवी मुंबई शहरातील नागरिकांचा स्वच्छतेसाठी नेहमीच सक्रि य सहभाग असल्याने नवी मुंबई हे नेहमीच स्वच्छतेत अग्रेसर राहिले असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक जयंत पवार यांनी केले. स्पर्धा यशस्वी रीतीने आयोजित करण्यात सहकार्य करणाºया मयूर एज्युकेअर सोसायटी, चेंज युवर लाइफ फाउंडेशन आणि आर. डी. फिल्म्स या संस्थांच्या प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले. या वेळी स्पार्क आणि आॅसम डान्स अॅकॅडमीच्या बाल कलावंतांनी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद घेतली. टिकटॉक आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाºया कलाकारांनीही विविध गीते सादर केली. या कार्यक्रमाला उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी नगरसेवक मान्यवर, महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबईचा रहिवासी होण्याची इच्छा
जागो मोहन प्यारे, अस्मिता अशा गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शक जयंत पवार यांनी लघुपट स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. नवी मुंबईसारखे मुळातच स्वच्छ शहर असताना येथील युवक लघुपटात काय दाखवतील, याची उत्सुकता असल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यातील इतर शहरांनी नवी मुंबईकडून बोध घ्यावा, असे सांगत नवी मुंबई शहराचा रहिवासी होण्याची इच्छा असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली.