स्वातंत्र्योत्सवात राष्ट्रशांतीचा संदेश देणार

By admin | Published: August 13, 2015 12:27 AM2015-08-13T00:27:20+5:302015-08-13T00:27:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि शांतीचा संदेश देण्यासाठी एक भव्य स्वातंत्र्योत्सव साजरा करणार

The message of nationalism in the freedom festival will be given | स्वातंत्र्योत्सवात राष्ट्रशांतीचा संदेश देणार

स्वातंत्र्योत्सवात राष्ट्रशांतीचा संदेश देणार

Next

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि शांतीचा संदेश देण्यासाठी एक भव्य स्वातंत्र्योत्सव साजरा करणार असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी देशभरात साजरा केल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यपर्वात नवी मुंबई शहरात राष्ट्रशांतीचा संदेश दिला जाणार असून बेलापूर विधानसभा क्षेत्रात मानवी साखळीद्वारे पाच हजार मीटर लांबीचा राष्ट्रध्वज फडकविला जाणार आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या कार्यक्रमात ५००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. शिरवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सेंट झेविअर्स हायस्कूल नेरूळ, बाळाराम पाटील हायस्कूल दारावे अशा अनेक शाळांमधील विद्यार्थी पारंपरिक वेषभूषेत कार्यक्रमात सहभागी होणार आहे. प्राईड आॅफ नेशनच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाद्वारे गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. या कार्यक्रमात पामबीच रोड येथील एन.आर.आय. कॉलनी, नेरूळ ते सानपाडा मोराज सिग्नलपर्यंत रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूस मानवी साखळी तयार केली जाणार आहे. यामध्ये बेटी बचाव, बेटी पढाओ, स्वच्छता की ओर एक कदम, पाणी वाचवा अशा घोषवाक्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. प्राईड आॅफ नेशनचे कासीम यांनी हा राष्ट्रध्वज तयार केला असून या माध्यमातून देशाप्रतिचे प्रेम व्यक्त करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे, अशी माहिती प्राईड आॅफ
नेशनचे कंपनीचे कासीम यांनी
दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The message of nationalism in the freedom festival will be given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.