शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

मीटर रीडिंगच्या दिरंगाईचा ग्राहकांना फटका, वीज बिल झाले दुप्पट : बिलांमध्ये दुरूस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:11 AM

मीटर रीडिंग वेळेवर घेतले जात नसल्याचा फटका नवी मुंबईकरांना बसला आहे. महिना पूर्ण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी मीटर रीडिंग केल्यामुळे वीज बिलांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मीटर रीडिंग वेळेवर घेतले जात नसल्याचा फटका नवी मुंबईकरांना बसला आहे. महिना पूर्ण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी मीटर रीडिंग केल्यामुळे वीज बिलांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. बिलांमध्ये दुरुस्ती करून द्यावी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाºयांनी केली आहे.महावितरण कंपनीने मीटर रीडिंग घेण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदारांनी पूर्वीचे रीडिंग घेतल्याच्या ३० दिवसांच्या आतमध्ये पुन्हा रीडिंग घेऊन ते बिल तयार करणाºया प्रणालीकडे देणे आवश्यक आहे. मीटर रीडिंगची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत; परंतु ठेकेदार वेळेवर नोंद घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एक महिना पूर्ण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी अनेक ठिकाणी रीडिंग घेतल्याचे निष्पन्न झाले.नेरुळ पश्चिमेला आॅगस्ट महिन्यामध्ये ३ तारखेला मीटर रीडिंग घेण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये ८ दिवस उशिरा अर्थात ११ सप्टेंबरला नोंद घेण्यात आली आहे. यामुळे बिलांमध्ये चक्क दुप्पट वाढ झाली आहे. विजेच्या वापरावर अधारित विजेचा दर निश्चित केला आहे. १०० युनिटपर्यंत ३ रुपये, ३०० युनिटपर्यंत ६ रुपये ७३ पैसे, ३०० ते ५०० दरम्यान ९ रुपये ७० पैसे दर आकारण्यात येतो. वेळेवर रीडिंग न घेतल्याने अनेकांच्या युनिट वापरामध्ये फरक पडून बिलाची रक्कम वाढते.राष्ट्रवादी काँगे्रसचे नेरुळ प्रभाग ८६ चे वार्ड अध्यक्ष महादेव माणिकराव पवार यांनी महावितरण अधिकाºयांना पत्र दिले आहे. वाढीव बिल आलेल्या राणा जयप्रकाश जगताप, गणपत प्रभात दळवी यांच्यासह अनेकांची बिले सादर केली आहेत. या बिलांवरील मीटर रीडिंगच्या तारखेमध्ये ८ ते १० दिवसांचा फरक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महावितरण अधिकाºयांनी तत्काळ बिलांमध्ये दुरुस्ती करून द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. महावितरण अधिकाºयांनीही त्रुटी निर्माण झाल्या असतील त्यांना दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई