मेट्रोचा प्रवास पुन्हा लांबणीवर, सिडकोने कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 11:30 PM2020-10-31T23:30:39+5:302020-10-31T23:31:03+5:30

CIDCO : सिडकोने बेलापूर ते पेन्धर, खांदेश्वर तळोजा, पेन्धर ते तळोजा आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ असे मेट्रोचे चार मार्ग नियोजित केले आहेत. याशिवाय हाच मेट्रो मार्ग पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत जोडला जाणार आहे.

Metro journey extended again, CIDCO tightened its belt | मेट्रोचा प्रवास पुन्हा लांबणीवर, सिडकोने कसली कंबर

मेट्रोचा प्रवास पुन्हा लांबणीवर, सिडकोने कसली कंबर

googlenewsNext

नवी मुंबई : विविध कारणांमुळे नवी मुंबई मेट्रोची मागील दहा वर्षांपासून रखडपट्टी सुरू आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी यापूर्वी अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या, परंतु या सर्व डेडलाइन हुकल्याने नवी मुंबईकरांच्या मेट्रोचा प्रवास लांबणीवर पडला. कोविडच्या संसर्गामुळे हे संपूर्ण वर्ष वाया गेले. त्यामुळे मेट्रोचा पहिला टप्पा आता २0२१ मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला 
आहे.      
    सिडकोने बेलापूर ते पेन्धर, खांदेश्वर तळोजा, पेन्धर ते तळोजा आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ असे मेट्रोचे चार मार्ग नियोजित केले आहेत. याशिवाय हाच मेट्रो मार्ग पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत जोडला जाणार आहे. यापैकी बेलापूर ते पेन्धर हा ११ किलोमीटर लांबीचा पहिलाच टप्पा दीर्घकाळापासून रखडला आहे. पहिल्या टप्प्यात ११ उन्नत स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी पहिल्या ६ मेट्रो स्थानकांचे काम अद्यापी अर्धवट अवस्थेत आहे, तर उर्वरित ५ मेट्रो स्थानकांची कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या डिसेंबर, २०२० पर्यंत क्रमांक ७ ते ११ या पाच मेट्रो स्थानकांची कामे पूर्ण होतील, असा विश्वास सिडकोच्या संबिधत विभागाने वाटतो आहे. शेवटची पाच स्थानके पूर्ण झाली, तरी पहिली सहा स्थानके पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे. कारण जोपर्यंत सर्व स्थानके उभारून पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मेट्रोची केबलिंग, सिग्नलिंग, ऑपरेशन आणि सीस्टिमची कामे करता येणार नाहीत. या सर्व परिस्थितीची गंभीर दखल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत २0२१मध्ये मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांना खुला करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.

कंत्राटदाराला सिडकोची नोटीस
सिडकोने तीन वर्षांपूर्वी मे. प्रकाश कन्स्ट्रोवेल या कंपनीला पहिल्या सहा स्थानकांची उभारणी करण्याचे काम दिले होते, परंतु विविध कारणांमुळे या कंपनीला हे काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे कंपनीने २ जुलै, २0२0 रोजी सिडकोला नोटीस बजावून स्थानकांचे काम पूर्ण करण्यास आपण असमर्थ ठरत असून सदर कंत्राट रद्द करावे, असे कळविले होते. कंत्राटदाराने नोटिसीद्वारे उपस्थित केलेले सर्व मुद्दे खोडून काढत सिडकोने मे. प्रकाश कन्स्ट्रोवेल या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Web Title: Metro journey extended again, CIDCO tightened its belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.