नवी मुंबईतील मेट्रो सेवा धूलिवंदन दिवशीही राहणार सुरु

By योगेश पिंगळे | Published: March 23, 2024 05:50 PM2024-03-23T17:50:58+5:302024-03-23T17:51:49+5:30

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी २ वाजेपासून मेट्रो सेवा पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय सिडकोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

Metro services in Navi Mumbai will continue on Dhulivandan holi day as well | नवी मुंबईतील मेट्रो सेवा धूलिवंदन दिवशीही राहणार सुरु

नवी मुंबईतील मेट्रो सेवा धूलिवंदन दिवशीही राहणार सुरु

नवी मुंबई : मागील काही महिन्यापूर्वी सुरु झालेल्या सिडकोच्या नवी मुंबईतील मेट्रो मार्ग क्रमांक १ बेलापूर ते पेणधर या मार्गावरून विविध कामानिमित्त प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सोमवारी २५ मार्च रोजी धूलिवंदनच्या दिवशी मेट्रो सेवा सकाळच्या वेळेत बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी २ वाजेपासून मेट्रो सेवा पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय सिडकोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

या दिवशी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत मेट्रो सेवा दर १५ मिनिटांनी उपलब्ध असणार असल्याचे सिडकोतर्फे कळविण्यात आले आहे. तरी या मार्गावरील प्रवाशांनी याची नोंद घेऊन त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करण्याचे आवाहन सिडकोच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Web Title: Metro services in Navi Mumbai will continue on Dhulivandan holi day as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.