मयूर तांबडे पनवेल : पंचायत समिती पनवेल येथील ग्रामपंचायत विभाग शिक्षण विभागाच्या हॉलमध्ये हलविण्यात आला आहे. कार्यालयांची झालेली दयनीय अवस्था पाहता सुरक्षेच्या कारणास्तव हे स्थलांतर करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पनवेल पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या सहा ते सात वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संपूनही ही इमारत बांधून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाला जुन्याच इमारतीत जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. पनवेल पंचायत समितीच्या जुन्या इमारतीवर प्लास्टिकचे कापड टाकण्यात आले आहे.नव्या इमारतीचे काम रखडल्याने जुन्या कार्यालयावर कापड टाकून कामकाज करण्यावर भर दिला जात आहे. पनवेल पंचायत समितीत रोज शेकडो नागरिक कामानिमित्त ये-जा करत असतात. मात्र, इमारतीचे काम रखडलेले असल्याने याच जुन्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाºयांना काम करावे लागते. उंदीर, घुशी यांचा वावर येथे वाढला आहे. इमारतीचे कामकाज रखडल्यामुळे कर्मचारी व अधिकाºयांना जीव धोक्यात घालून येथे काम करावे लागते. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी गत या ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांची झाली आहे. त्यामुळे या कार्यालयीन दुरवस्थेला व नव्या इमारतीच्या प्रतीक्षेला कर्मचारी वर्ग पुरता वैतागला आहे.तालुका पंचायत समितीच्या इमारतीचे काम सहा वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. पंचायत समितीची जुनी इमारत जमीनदोस्त करून त्या जागेवर ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर नूतन वास्तूचे बांधकाम २०१० साली हाती घेण्यात आले आहे. प्रशासकीय भवनबरोबर या ठिकाणी व्यापारी संकुलही उभारण्यात येणार आहे. त्यातील गाळे संबंधित बिल्डरला देण्यात आले असून, तो त्याची विक्र ी करणार असल्याचे करारात नमूद आहे. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे ठरलेले असताना जवळपास सात वर्षे होत आली तरी तो अर्धवट स्थितीत आहे. जुन्या पंचायत समितीच्या कार्यालयात काम करणेही अधिकाºयांना अवघड होऊन बसले आहे. येथील कार्यालयांना ठिकठिकाणी तडे गेल्याने ते कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.याच कारणांमुळे ग्रामपंचायत विभाग शेजारीच असलेल्या शिक्षण विभागाच्या हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे.>कर्मचाºयांचा जीव धोक्यातइमारतीचे काम रखडलेले असल्याने याच जुन्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाºयांना काम करावे लागते. उंदीर, घुशी यांचा वावर येथे वाढला आहे. इमारतीचे कामकाज रखडल्यामुळे कर्मचारी व अधिकाºयांना जीव धोक्यात घालून येथे काम करावे लागते.
ग्रामपंचायत विभागाचे शिक्षण विभागात स्थलांतर, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यालय हलवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 2:36 AM