शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

थंडी अन् मकर संक्रांतीत बाजरी देतेय मायेची ऊब

By नामदेव मोरे | Published: January 08, 2024 6:53 PM

१८५ टन आवक : बाजारभाव नियंत्रणात आल्यामुळे ग्राहकांमध्येही समाधान

नवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून उष्णतावर्धक खाद्यपदार्थांना मागणी वाढू लागली आहे. वाढलेली थंडी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीची आवक वाढू लागली आहे. सोमवारी १८५ टन आवक झाली आहे. हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत असून, भावही नियंत्रणात आल्यामुळे ग्राहकही बाजरी खरेदीला पसंती देत आहेत.

कोरोनापासून मुंबई, नवी मुंबईकरांमध्ये आरोग्याविषयी जागृती वाढली आहे. हंगामाप्रमाणे आहारामधील खाद्यपदार्थांमतध्ये बदल केला जात आहे. हिवाळ्यामध्ये बाजरीच्या मागणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. मकर संक्रांत व वाढलेली थंडी यामुळे यावर्षीही बाजरीला मागणी वाढली आहे. नियमित १० ते ३० टन बाजरीची आवक होते. थंडी सुरू झाल्यापासून रोज ५० टनपेक्षा जास्त आवक होत आहे. सोमवारी सर्वाधिक १८५ टन आवक झाली आहे. राज्याच्या विविध भागांमधून व इतर राज्यांमधूनही बाजरी विक्रीसाठी येत आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये बाजरी २८ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हे दर २७ ते ३७ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये ४५ ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ज्वारी व गव्हापेक्षाही बाजरी स्वस्त असल्यामुळे ग्राहकांकडूनही बाजरीला पसंती दिली जात आहे.

अनेक घरांमध्ये बाजरीच्या भाकरीला नियमित प्राधान्य दिले जात आहे. हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत आहे. याशिवाय बाजरीपासून इतर मेनूही बनविले जात आहेत.राज्यातील बाजरीचे बाजारभावबाजार समिती - भावमुंबई - २७ ते ३७नंदुरबार - २४ ते २५नांदगाव - २६ ते २६.६०चोपडा - २५ ते २५.५०बीड - २४पुणे - ३३ ते ३५देवळा - २५ ते २६

कुठे पिकते बाजरीमहाराष्ट्रात नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथे बाजरीचे उत्पादन होते. देशात राजस्थान, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्ये बाजरीचे उत्पादन होते. काही प्रमाणात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पंजाबमध्येही उत्पादन घेतले जाते.बाजरी खाण्याचे फायदेयामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे घटक असतात. रक्तदाब, कोलेस्ट्रॉलसारखे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठीही बाजरीचा उपयोग होतो. बुद्धकोष्ठता, हाडांना मजबुती व इतरही औषधी गुण यामध्ये असतात.

बाजरीचा वापर - बाजरीची भाकरी, कटलेट्स, खिचडी, मेथी वडे व सूप बनविण्यासाठीही याचा वापर केला जातो.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई