महापालिका निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री

By admin | Published: April 28, 2017 12:38 AM2017-04-28T00:38:49+5:302017-04-28T00:38:49+5:30

येत्या २४ मे रोजी होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीत खरी लढत शेकाप आणि भाजपात असली तरी तिसऱ्या आघाडीच्या

MIM entry in municipal elections | महापालिका निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री

महापालिका निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री

Next

पनवेल : येत्या २४ मे रोजी होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीत खरी लढत शेकाप आणि भाजपात असली तरी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एमआयएमने निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तिसऱ्या आघाडीत एमआयएमसह अनेक छोट्या पक्षांचा समावेश आहे.
खारघर सेक्टर १० याठिकाणी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून एमआयएमने पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एमआयएमचे रायगड जिल्हा प्रभारी शहनवाज खान यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जाणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे खान यांनी सांगितले. खारघर आणि पनवेलमध्ये या पक्षाच्या जाहीर सभा होणार आहेत. पनवेल महानगर पालिका हद्दीतील अल्पसंख्याक मतदारांवर एमआयएमचा डोळा असल्याचे समजते.
मुस्लीम प्रबळ मतदार संघात एमआयएम जास्तीत जास्त उमेदवार उतरविण्याचे चिन्ह आहे. यामध्ये पनवेल, खारघर, तळोजामधील प्रभागांचा समावेश असणार आहे. निवडणूक लढविण्यासाठी फक्त मुस्लीम समाजाचेच नव्हे, तर बहुजन, दलित, मराठा, अनुसूचित समाजातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे रायगड जिल्हा प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी सांगितले आहे. एकूणच एमआयएमच्या माध्यमातून पनवेलच्या निवडणुकीत आता एमआयएमची एन्ट्री होणार असल्याने प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. (वार्ताहर)

Web Title: MIM entry in municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.