नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील अंतर्गत रस्त्यांवर यावर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्ड्यांचे पडसाद सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले होते. प्रशासनाच्या कामावर लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांनीही अनंत चतुर्दशीअगोदर खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच कामात हयगय करणाºया संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सूचित केले होते. गुरु वारी अनंत चतुर्दशी असल्याने मंगळवारीच प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरु वात केली.
गणरायाचे आगमन झाल्यापासून यावर्षी पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत स्थायी समिती सभेत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले होते. अनंत चतुर्दशी दिनी सार्वजनिक उत्सव मंडळांच्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती विचारात घेऊन तातडीने खड्डे भरणा करून रस्ते सुधारणा करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासनाला दिल्या. या कामात हयगय करणाºया संबंधित अभियंते व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. गुरु वार, १२ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला शहरातील सार्वजनिक मोठ्या गणपतींचे विसर्जन असल्याने प्रत्येक नोडमधील तलावाच्या दिशेने येणारे रस्ते तसेच तलाव परिसरातील रस्त्यांची सुधारणा करण्याच्या कामाला प्रशासनाने मंगळवारी सुट्टीच्या दिवशी सुरु वात केली. खड्डे भरण्यासाठी काँक्र ीट, पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात येत आहे; परंतु शहरातील काही ठिकाणी खड्डे भरण्यासाठी माती आणि खडीचे मिश्रण वापरले जात असल्याने पावसात अनंत चतुर्दशीच्या आधी पुन्हा खड्डे पडणार असल्याने नागरिकांनी कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत नाराजी व्यक्त केली आहे.