ठोक मानधनावरील कर्मचा-यांना आता मिळणार किमान वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 02:29 AM2017-08-17T02:29:30+5:302017-08-17T02:29:59+5:30

महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ठोक मानधनावर कार्यरत असणा-या कर्मचा-यांना किमान वेतन लागू करण्यात येणार आहे.

Minimum increments will be given to employees on the hollow scale | ठोक मानधनावरील कर्मचा-यांना आता मिळणार किमान वेतन

ठोक मानधनावरील कर्मचा-यांना आता मिळणार किमान वेतन

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ठोक मानधनावर कार्यरत असणा-या कर्मचा-यांना किमान वेतन लागू करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, ५२९ कर्मचाºयांना तत्काळ लाभ होणार असून, त्यांच्या वेतनासाठी वार्षिक ४ कोटी ५८ लाख रुपये खर्च होणार आहेत.
महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ३२७९ पदांना शासनाची मंजुरी आहे. सद्यस्थितीमध्ये २३३९ कर्मचारी विविध पदांवर काम करत आहेत. आस्थापनेवरील तब्बल ९४० पदे रिक्त आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने कर्मचाºयांची संख्या अपुरी पडत असल्याने विविध विभागप्रमुखांकडून ठोक मानधनावर करार पद्धतीने कर्मचाºयांच्या नेमणुकीबाबत वारंवार मागणी करण्यात येते. यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५३ (३)मधील तरतुदीअन्वये सद्यस्थितीत विविध विभागांसाठी ६०३ कर्मचारी वेळोवेळी सहा महिन्यांकरिता करार पद्धतीने नेमण्यात आले आहेत. सद्यस्थितीमध्ये सर्वांना ठोक मानधन देण्यात येत आहे. यापुढे सर्वांना किमान वेतन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
कुशल कामगारांना १४ हजार, अर्धकुशल कामगारांना १३ हजार व अकुशल कामगारांना ११५०० रुपये किमान वेतन देण्यात येणार आहे. विशेष भत्ता, घरभाडे भत्ता, बोनस, भविष्य निर्वाह निधीचाही त्यामध्ये समावेश असणार आहे. यासाठी पालिकेला महिन्याला ३८ लाख १७ हजार व वर्षाला ४ कोटी ५८ लाख रुपये अतिरिक्त बोजा पडणार आहे.
>पदनाम कार्यरत
कर्मचारी
कनिष्ठ अभियंता ४१
बायोमेडिकल इंजिनीअर ०१
प्रदूषण निरीक्षक ०१
लिपिक संवर्ग २३३
वर्ग सहायक ०८
दूरध्वनी चालक ०३
सर्व्हेअर ०१
वाहनचालक ३८
डेंटल हायजिनिस्ट ०१
शस्त्रक्रिया सहसहायक ०४
लॅब असिस्टंट ०२
वैद्यकीय समाजसेवक ०३
>पदनाम कार्यरत
कर्मचारी
बायोमेडिकल सहायक ०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०३
एएनएम १३
क्ष किरण अटेंडंट ०५
औषधनिर्माता ११
नाभिक ०३
आरोग्य कर्मचारी ३३
शिपाई ४३
नोटीस बजावणीस २२
समूह संघटक २५
उपस्वच्छता निरीक्षक ११
इतर १८

Web Title: Minimum increments will be given to employees on the hollow scale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.