इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 10:36 AM2023-07-20T10:36:24+5:302023-07-20T10:36:46+5:30

रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली

Minister Aditi Tatkare visited the Irshalwadi accident victims at the hospital | इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

googlenewsNext

कळंबोली - खालापूर जवळील इरशाळ वाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. 

रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली.  यावेळी एमजीएम चे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ.आनंद  गोसावी  नायब तहसीलदार  लाचके
उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. इथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत.

Web Title: Minister Aditi Tatkare visited the Irshalwadi accident victims at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.