वसई : नॅशनल स्कूलची नववी शालेय मिनीथॉन स्पर्धा येत्या रविवारी विरार येथे होत असून यात शालेय विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि पालक सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबत खेळही महत्वाचा असतो. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्याचा व उर्जेचा सकारात्मक व विधायक उपक्रमांमध्ये उपयोगात आणण्याच्या हेतूने स्कूलने दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली. स्पर्धेचे यंदा नववे वर्ष असून रविवारी विरार पश्चिमेकडील विराट नगर येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेत सहा वर्षांच्या मुलांच्या गटापासून ते १७ वर्षांवरील गटात मुले, माजी विद्यार्थी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक सहभागी होणार आहेत. यंदा आतापर्यंत सतराशे स्पर्धकांनी नावे नोंदवली आहेत. पहिल्या तीन विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात ेयेणार असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती विश्वस्त दीपक कुलकर्णी यांनी दिली. या स्पर्धेबाबत संपूर्ण शहरात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
विरारमध्ये रविवारी मिनीथॉन
By admin | Published: November 18, 2016 2:09 AM