लघु लेखकास लाच घेताना अटक

By admin | Published: January 24, 2017 06:03 AM2017-01-24T06:03:47+5:302017-01-24T06:03:47+5:30

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या उच्चश्रेणी लघु लेखकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई करुन अटक

Minor author arrested for taking bribe | लघु लेखकास लाच घेताना अटक

लघु लेखकास लाच घेताना अटक

Next

नवी मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या उच्चश्रेणी लघु लेखकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई करुन अटक केली आहे. कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
दिनेश सोनोने (५३) असे कारवाई झालेल्या जात पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात कल्याणमधील एका अर्जदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी सीबीडी येथील कोकण भवण इमारतीलधील जात पडताळणी कार्यालयात पत्नीच्या जात पडताळणीसाठी अर्ज केला होता. परंतु सोनोने याने त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागीतली होती. यामुळे अर्जदाराने त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. यानुसार सोमवारी दुपारी जात पडताळणी कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. यावेळी अर्जदाराकडून एकून रकमेपैकी ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. त्याच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Minor author arrested for taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.