वडिलांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:18 AM2017-12-29T05:18:32+5:302017-12-29T05:18:40+5:30
नवी मुंबई : एपीएमसी परिसरात १३ वर्षांच्या मुलीवर पित्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विजय गावणंग या आरोपीला अटक केली आहे.
नवी मुंबई : एपीएमसी परिसरात १३ वर्षांच्या मुलीवर पित्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विजय गावणंग या आरोपीला अटक केली आहे.
मजुरीचे काम करणारा आरोपी विजय गावणंग कुटुंबीयांसह कोपरी गावामध्ये राहतो. त्याने मे २०१७पासून मुलीवर २०पेक्षा जास्त वेळा अतिप्रसंग केला. मुलगी गर्भवती राहिल्याने त्याने गर्भपात करण्याचा प्रयत्नही केला; परंतु डॉक्टरांनी पोलिसांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय काहीही करता येणार नाही, असे स्पष्ट केले. यामुळे या कुटुंबीयांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खोटी माहिती देऊन पोलिसांचा दाखला मिळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलीकडे विचारणा केली असता, वडिलांनीच हा प्रकार केला असल्याची कबुली दिली. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.