पनवेल : आदिवासी समाजातील एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पनवेल शहर पोलिसांनी एक २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अलिबागला फिरायला घेऊन जातो, असे सांगून तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.दशरथ गण्या पारधी, असे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित मुलीला पनवेल बसस्थानकातून अलिबागला फिरण्यासाठी घेऊन गेला. त्याने तिला अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यावर नेले. येथे त्याने तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. घरी परतल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. या प्रकाराने भयभीत झालेल्या मुलीच्या आईने अखेर १८ एप्रिल रोजी या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांत तक्रारदाखल केली. पोलिसांनी आरोपी दशरथ गण्या पारधी याला अटक केली आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:05 AM