कृषी बाजार योजनेस अल्प प्रतिसाद, मुंबईत ई-नाम कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 03:59 AM2020-03-17T03:59:11+5:302020-03-17T03:59:35+5:30

मुंबई, पुण्यासह जवळपास ११ मार्केटमध्ये ही योजना फक्त कागदावरच असून तीन वर्षांत एक रुपयाचीही उलाढाल झालेली नाही. ​​​​​​​

Minor response to the agricultural market scheme, e-name in Mumbai on paper | कृषी बाजार योजनेस अल्प प्रतिसाद, मुंबईत ई-नाम कागदावरच

कृषी बाजार योजनेस अल्प प्रतिसाद, मुंबईत ई-नाम कागदावरच

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेस राज्यात अद्याप समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. ३0५ पैकी फक्त ६0 बाजार समित्या ई-नामशी जोडण्यात आल्या असून त्यापैकी ३२ मार्केटमध्येच ५0 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री आॅनलाइन लिलाव पद्धतीने सुरू आहे. मुंबई, पुण्यासह जवळपास ११ मार्केटमध्ये ही योजना फक्त कागदावरच असून तीन वर्षांत एक रुपयाचीही उलाढाल झालेली नाही.

कृषी व्यापारामध्ये पारदर्शीपणा आणून शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांसाठी राष्ट्रीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली आहे. एप्रिल २0१६ मध्ये यासाठीचे पोर्टल सुरू करण्यात आले असून सद्य:स्थितीमध्ये देशातील ५८५ बाजार समित्या ई-नामशी जोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ३0५ बाजार समित्या असून त्यापैकी फक्त ६0 या योजनेशी जोडण्यात आल्या आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये २0१७ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. बाजार समितीने कृषी माल ई-नाम लिलाव कक्ष व प्रयोगशाळाही सुरू केली आहे. शासनाच्या पोर्टलवर व्यापारी व अडत्यांची नोंदणीही केली आहे. परंतु तीन वर्षांमध्ये एक रुपयाचीही उलाढाल या माध्यमातून झालेली नाही. मुंबईप्रमाणे, पुणे, खामगाव, सांगली, सोलापूर, लोणारसह १२ बाजार समित्यांमध्ये फेब्रुवारी २0२0 मध्ये उलाढालच झालेली नाही.
या योजनेसाठी नोंदीत झालेल्या फक्त ३२ बाजार समित्यांमध्येच ५0 टक्क्यांपेक्षा जास्त मालाची आॅनलाइन पद्धतीने विक्री होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनीही या योजनेला विरोध केला आहे. येथे प्रतिदिन १२ ते १५ हजार टन कृषी माल रोज विक्रीसाठी येत असतो. ई-नामप्रमाणे हा माल विकणे प्रत्यक्षात शक्य नाही. ही पद्धत व्यवहार्य नसल्याची भूमिका व्यापाºयांनी घेतली आहे. प्रशासनाने व्यापाºयांमध्ये जनजागृती केल्यानंतरही त्यास प्रतिसाद मिळत नाही. कृषी पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक एम.एल. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ई-नाम योजनेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अंमलबजावणी करताना येणाºया अडचणी केंद्र शासनासही कळविण्यात आल्या असून या योजनेस पूर्वीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ई-नाम योजनेचा तपशील

देशातील ५८५ मार्केट ई-नाम
योजनेशी जोडण्यात आले आहेत.
देशातील १ लाख २७ हजार व्यापारी
व अडत्यांची नोंदणी झाली आहे.
राज्यातील ३0५ पैकी ६0 मंडई ई-नामशी जोडल्या असून १६,७२४ व्यापाºयांची नोंदणी झालेली आहे.

ई-नामच्या माध्यमातून अल्प व्यवहार होणाºया बाजार समित्या
मुंबई, पुणे, धुळे, खामगाव, सांगली, सोलापूर, लोणार, अहेरी
समाधानकारक व्यवहार सुरू असलेल्या बाजार समित्या
नेवासा, पिंपळगाव, अंजनगाव सुरजी, औरंगाबाद, हिंगोली, सेलू, अर्जुनी मोरगाव, कराड, गोंदिया

Web Title: Minor response to the agricultural market scheme, e-name in Mumbai on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.