मिसाळ यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:56 PM2019-07-18T23:56:22+5:302019-07-18T23:56:35+5:30

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची बदली झाली असून, महापालिकेच्या आयुक्तपदी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Misal's acceptance of duty as commissioner | मिसाळ यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार

मिसाळ यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार

Next

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची बदली झाली असून, महापालिकेच्या आयुक्तपदी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी १८ जुलै रोजी मिसाळ यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामास्वामी एन. यांचा निरोप समारंभ आणि मिसाळ यांचा स्वागत समारंभ महापालिका मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर जयवंत सुतार यांनी आयुक्त रामास्वामी यांच्या माध्यमातून शहरात अनेक वेगवेगळी कामे झाली असून सभागृहात अर्थसंकल्पात मांडलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचे सांगितले. नव्याने नियुक्त झालेले आयुक्त मिसाळ यांनी रामास्वामी एन. यांच्या माध्यमातून सुरू असलेली सर्व कामे पूर्ण करावीत, तसेच रु ग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची जबाबदारी मिसाळ यांची राहणार असल्याचे सांगितले. मिसाळ महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी अशा सर्वांना सोबत घेऊन शहरातील नागरिकांना अभिप्रेत असलेले अधिक चांगले काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
आधुनिक शहर म्हणून तसेच देशात स्वच्छतेत सातवे मानांकन असलेल्या नवी मुंबईचा नावलौकिक अधिक दर्जेदार नागरी सुविधांची पूर्तता करून वाढविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्र माला महापालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिसाळ मराठवाडा कृषी विद्यापीठातून एम.एस.सी. (अ‍ॅग्रीकल्चर) व नेदरलँड हेग येथील इन्स्टिट्यूट आॅफ सोशल स्टडीजमध्ये सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन या विषयात एम.ए. द्विपदवीधारक असणारे मिसाळ हे २00३ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकारी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अनेक लोककल्याणकारी धोरण निर्मिती प्रक्रि येत त्यांनी कामगिरी केली आहे. रायगड जिल्हा परिषदेत स्वच्छता अभियानासह उल्लेखनीय नागरी सुविधा कामांमध्ये लोकाभिमुख कार्य, केले आहे.

Web Title: Misal's acceptance of duty as commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.