सरकारची हुकूमशाही शिवसेना मोडीत काढणार: भास्कर जाधव 

By नामदेव मोरे | Published: October 19, 2022 01:23 PM2022-10-19T13:23:41+5:302022-10-19T13:24:29+5:30

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात नवी मुंबईत आंदोलन

mla bhaskar jadhav said shiv sena will destroy the dictatorship of the government | सरकारची हुकूमशाही शिवसेना मोडीत काढणार: भास्कर जाधव 

सरकारची हुकूमशाही शिवसेना मोडीत काढणार: भास्कर जाधव 

googlenewsNext

नवी मुंबई: शिवसेना नेत्यांचे संरक्षण काढले जात आहेत. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांच्या आडून सरकार हुकूमशाहीप्रमाणे वागत आहेत.  सरकारच्या दडपशाहीला घाबरत नसून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिला.

नवी मुंबईतील शिवसेना माजी नगरसेवकावर हद्दपारी ची कारवाई केली त्याविरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव, अंबादास दानवे, राजन विचारे यांनी सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. शिवसैनिकांवर खोट्या केसेस केल्या जात आहेत.  दबाव आणला जात आहे. अन्याय सुरू आहे. सत्ताधारी सत्ता हातात घेत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. शिवसैनिकांना लक्ष केले जात आहे. या हुकूमशाहीला शिवसैनिक घाबरत नाहीत. विस्तवाला हात लावू नका जळून खाक व्हाल असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला. यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, केदार दिघे उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mla bhaskar jadhav said shiv sena will destroy the dictatorship of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.