ओव्हर लोडिंगविरोधात मनसे आक्रमक, आरटीओ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:43 AM2020-01-10T00:43:11+5:302020-01-10T00:43:16+5:30
नवी मुंबईत ट्रक, डम्पर, कंटेनर, बसेसमधून होणारी सामानाची व प्रवाशांची ओव्हरलोडिंग तत्काळ कारवाई करून थांबवण्यात यावी,
नवी मुंबई : नवी मुंबईत ट्रक, डम्पर, कंटेनर, बसेसमधून होणारी सामानाची व प्रवाशांची ओव्हरलोडिंग तत्काळ कारवाई करून थांबवण्यात यावी, यासाठी नवी मुंबई मनसे वाहतूक सेनेतर्फे गुरुवारी वाशी येथील आरटीओवर कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात आला.
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांचे नुकसान होत असल्याची बाब मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी निदर्शनास आणून दिली. या वाहनांवरच्या कारवाईकडे आरटीओचे दुर्लक्ष होत आहे. ओव्हरलोड चालणारी वाहने व प्रवासी बसेस यामधून बेकायदा व्यावसायिक मालाची वाहतूक केली जात असून आरटीओने कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही या विषयाकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर यांनी केला.
चाबूक मोर्चाचे आयोजन मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने सहायक उप-प्रादेशिक अधिकारी राजेंद्र सावंत, शितोळे देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देऊन नवी मुंबईतील रस्त्यांवर सुरू असणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. प्रवासी बसेसमधून अनधिकृतपणे होणारी व्यावसायिक मालाची वाहतूक कारवाई करून बंद करावी, तसेच नवी मुंबईतील मुदत संपलेल्या परमिट रिक्षा जप्त करून कारवाई करण्याची मागणी केली. आरटीओ अधिकाºयांनी मागण्या मान्य करत २० जानेवारीपासून संबंधित वाहतूकदारांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडला दिले. या वेळी जमीर पटेल, सचिन जाधव, अभिलेश दंडवते, महेश कदम, नितीन लष्कर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.