नवी मुंबई : रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाच्या मार्गावर गणेशभक्तांचे हाल होणार आहेत. याचा संताप व्यक्त करत मनसेच्या शिष्टमंडळाने पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात आंदोलन केले. या वेळी त्यांनी चिखलाने भरलेले कपडे घालून अधिकाऱ्याच्या चेहºयाचे मुखवटे घालून प्रशासनाचा निषेध केला.
पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या डागडुजीची कामे करूनही रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे खड्डे अनंत चतुर्दशीपुर्वी बुजवण्याची मागणी गणेशभक्तांकडून होत आहे. तशा प्रकारचा इशारा देखील मनसेकडून देण्यात आला होता. यानंतरही एक दिवसावर अनंत चतुर्दशी आलेली असतानाही गणेशाच्या मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे मनसेचे उपशहर अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात आंदोलन केले.
या वेळी श्रीकांत माने, सचिन कदम, अमोल मापारी, उमेश गायकवाड, अमोल आयवळे, अभिजित देसाई आदी उपस्थित होते. त्यांनी पालिका अधिकाºयाच्या चेहºयाचा मुखवटा व चिखलाने भरलेले कपडे घालून दालनात घोषणाबाजी केली. तसेच प्रशासनाला रस्त्यावरील मोठमोठे खड्डे देखील दिसत नसल्यास, ते पाहण्यासाठी दुर्बिण भेट देण्यात आली.