नवी मुंबई : पाकिस्तानची साखर विकू नये या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंदोलन केले. पाकिस्तानचे झेंडे जाळून निषेध केला. व्यापाऱ्यांनीही मार्केटमध्ये पाकिस्तानची साखर आलेली नाही व यापुढेही विकली जाणार नसल्याचे आश्वासन दिले.देशात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. पुरेसा साठा असूनही पाकिस्तानवरून साखर आयात करून कमी दराने विकली जात आहे. राज्यातील शेतकºयांचे नुकसान करण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप करून मनसेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गोडाऊनमध्ये जाऊन पाहणी केली. सर्व साखर व्यापाºयांची भेट घेऊन त्यांना पाकिस्तानची साखर घेऊ नये व ग्राहकांना विकू नये अशा आशयाचे पत्र दिले. मार्केटमध्ये पाकिस्तानचे झेंडे जाळून निषेध केला. शुगर मर्चंट असोसिएशनने मनसे शिष्टमंडळाला पाकिस्तानची साखर न विकण्याचे आश्वासन दिले. नवी मुंंबईचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे म्हणाले, राज्यात साखरेचा पुरेसा साठा असताना पाकिस्तानची साखर आयात करून स्वस्त दरात विकली जात आहे.पणनमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सद्य:स्थितीमध्ये राज्यामध्ये कुठेही पाकिस्तानची साखर विकली जात नाही. विकली जात असल्यास त्याची माहिती घेतली जाईल. केंद्र शासनाने आयात शुल्कामध्ये १०० टक्के वाढ केली असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
नवी मुंबईत मनसेने पाकिस्तानचे झेंडे जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:38 AM