खारघरमध्ये परप्रांतीय मच्छिविक्रेत्यांना मनसेचा चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 03:53 PM2022-10-30T15:53:03+5:302022-10-30T15:53:37+5:30
खारघर शहरातील से.15 याठिकाणी मच्छि मार्केट मध्ये स्थानिक कोळी महिला मच्छि विक्रीचा व्यवसाय करतात.
लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल:खारघर शहरात परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे.घरोघरी जाऊन मच्छि विक्री करणाऱ्या या परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांमुळे स्थानिक व पारंपरिक मच्छि विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आल्याने दि.30 रोजी मनसेचे शहर अध्यक्ष गणेश बनकर यांनी मच्छि विक्रेत्या महिलांसोबत परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांना चोप दिला.
खारघर शहरातील से.15 याठिकाणी मच्छि मार्केट मध्ये स्थानिक कोळी महिला मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात.मात्र बाहेरून परप्रांतीय विक्रेते येणाऱ्या ग्राहकाला बाजारपेठेच्या बाहेरच मच्छि विकून मोकळे होत असल्याने या स्थानिक मच्छि विक्रेत्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत या महिलांनी मनसेचे शहर अध्यक्ष गणेश बनकर यांच्याकडे दाद मागितली होती.रविवार दि.30 रोजी या महिलांच्या उपस्थितीत बनकर यांनी परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांना मनसेचा खाक्या दाखवत शहरात अनधिकृतपणे मच्छि विक्री न करण्याचा ईशारा दिला.मनसेच्या या आंदोलनानंतर काही परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांनी शहरातून पळ काढला.स्थानिक पोलीस प्रशासन अथवा पालिकेच्या माध्यमातून या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी गणेश बनकर यांनी केली आहे.या परप्रांतीय मच्छि विक्रेते विक्री करत असलेल्या मासळीच्या दर्जा बाबत देखील बनकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.