नवी मुंबई : वाशी सेक्टर ३० अ मध्ये महाराष्ट्र भवनसाठी भूखंड राखीव ठेवला आहे; परंतु येथे प्रत्यक्ष भवनचे काम केले जात नाही. मनसेने या भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नामफलक लावला. १ मेपर्यंत शासनाने काहीच कार्यवाही केली नाही तर भूमिपूजन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.सिडकोने वाशी रेल्वे स्टेशनसमोर सर्व राज्यांचे भवन निर्माण करण्यासाठी भूखंड आरक्षित केले आहेत. आसाम, उत्तर प्रदेश, मेघालय, केरळ, राजस्थान व इतर काही राज्यांनी या भूखंडावर त्यांच्या राज्यांचे भव्य भवन उभे केले आहेत. महाराष्ट्र भवनसाठी सेक्टर ३० अ मध्ये भूखंड राखीव ठेवला आहे. १५ वर्षांनंतरही अद्याप या भूखंडाचा विकास करण्यात आलेला नाही. सिडकोने येथे लावलेला नामफलकही गायब झाल्याने तो भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याची शक्यता असल्याने मनसेने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून त्या भूखंडावर भवनचा नामफलक लावला आहे. शहर प्रमुख गजानन काळे व इतर पदाधिकाºयांनी भवनचे काम झालेच पाहिजे, सिडको व राज्य शासनाचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. सदर भूखंड महाराष्ट्र भवनसाठी राखीव असून कोणीही अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.राज्य शासनाने या भूखंडाचा विकास करावा. राज्याच्या कानाकोपºयातून स्पर्धा परीक्षा व इतर कामांसाठी येणाºया विद्यार्थ्यांना या भवनचा उपयोग होऊ शकतो.१ मेपर्यंत शासनाने भूमिपूजनासाठी योग्य निर्णय घेतला नाही तर मनसे स्वत:च भूमिपूजन करेल, असा इशारा मनसेचे शहर प्रमुख गजानन काळे यांनी दिला आहे.
मनसेने लावला महाराष्ट्र भवनचा नामफलक, शासनाच्या दिरंगाईचा निषेध : १ मेला भूमिपूजनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:53 AM