रस्त्यावर सापडलेले मोबाईल वाहतूक पोलिसांना केला परत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 09:03 PM2020-08-14T21:03:11+5:302020-08-14T21:03:25+5:30

खारघर शहरातील कोपरा ब्रिज येथे शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास वाहतूक पोलीस मयूर पाटील व पंकज वानखेडे हे वाहतूक नियमन करीत असताना एक बेवारस मोबाईल फोन मयूर पाटील यांच्या नजरेस पडला.

Mobile traffic found on the road was returned to the police | रस्त्यावर सापडलेले मोबाईल वाहतूक पोलिसांना केला परत

रस्त्यावर सापडलेले मोबाईल वाहतूक पोलिसांना केला परत

Next

पनवेल : कोरोनासारख्या संसर्गजन्य घातक आजारात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणाऱ्या खारघर वाहतूक शाखेतील वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल शुक्रवारी संबंधित मोबाईल धारकाला परत करत एक आदर्श निर्माण केला आहे. खारघर शहरातील कोपरा ब्रिज येथे शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास वाहतूक पोलीस मयूर पाटील व पंकज वानखेडे हे वाहतूक नियमन करीत असताना एक बेवारस मोबाईल फोन मयूर पाटील यांच्या नजरेस पडला.

वाहतूक पोलीस मयूर पाटील यांनी संबंधित फोन मोबाईलवर कॉल आल्यांनतर मोबाईल धारकाला तुमचा फोन सुरक्षित असल्याचे सांगत खारघर वाहतूक शाखा येथे येण्यास सांगितले. सदर मोबाईल मालकीची खात्री पाटल्यांनंतर संबंधित मोबाईल हा सुजता जितेंद्र शर्मा या खारघर सेक्टर 12 मधील रहिवासी असलेल्या महिलेचा असल्याचे उघड झाल्यांनतर त्यांना हा फोन सुपूर्द केला. वाहतूक पोलिसांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना मोबाईल धारकांनी धन्यवाद दिले. वरिष्ठांनी देखील या वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

Web Title: Mobile traffic found on the road was returned to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.