शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची मॉक ड्रिल ;32 रूग्णालयांना दिल्या भेटी

By वैभव गायकर | Published: April 10, 2023 6:14 PM

नागरिकांनी कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांसाठी महापालिकेच्यावतीने सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचण्या व ॲण्टीजन चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  

पनवेल: राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या सूचनेनूसार आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानूसार पनवेल महापालिका क्षेत्रातील 32 खाजगी रूग्णालये व महापालिकेच्या कोविड समर्पित रूग्णालयांतील उपाययोजनांची पाहणी अर्थात ‘मॉक ड्रील’( संकट कालीन बचाव प्रशिक्षण) महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आले. 

कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती वैद्यकिय आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश पंडित, डॉ.भक्तराज भोईटे यांनी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील एकुण 32 खाजगी रूग्णालये तसेच कळंबोली येथील महापालिकेच्या कोविड समर्पित केंद्राची पाहणी केली. याठिकाणी आरोग्य सुविधांची उपलब्धता, अलगीकरण खाटांची क्षमता, आयसीयू व ऑक्सीजन सुविधायुक्त खाटा,  व्हेटिंलेटर खाटा,ऑक्सीजन सिलेंडर, ऐनवेळी लागणारी औषधे, इंजेक्शन्स, पीपीई किट, जनरल बेड्स, मनुष्यबळ ,यंत्रसामुग्री या सर्वांची पहाणी करण्यात आले.

तसेच नागरिकांनी कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांसाठी महापालिकेच्यावतीने सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचण्या व ॲण्टीजन चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांनी सौम्य लक्षणे असल्यास  कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी , गर्दीच्या ठिकाणी , सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होई पर्यंत स्वतः घरी अलगीकरणात राहावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी,असे आवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.