मोहन निनावे सावरणार सिडकोच्या ‘नैना’ची बाजू
By नारायण जाधव | Published: December 15, 2023 07:32 PM2023-12-15T19:32:37+5:302023-12-15T19:32:50+5:30
जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या मोहन निनावे यांची सिडकोच्या बहुचर्चित नैना प्रकल्पाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबई : जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या मोहन निनावे यांची सिडकोच्या बहुचर्चित नैना प्रकल्पाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गकर यांच्या आदेशानुसार कार्मिक विभागाचे महाव्यवस्थापक फैयाज खान यांनी शुक्रवारी निनावे यांच्या नियुत्तीचे आदेश काढले.
निनावे यांनी यापूर्वीही बुद्धभूषण गायकवाड यांच्यानंतर जनसंपर्क अधिकारी म्हणून पडत्या काळात सिडकोची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता सिडकोच्या नैना प्रकल्पात त्यांना धाडण्यात आले आहे.
सध्या प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे नैना प्रकल्प चर्चेत आहे. मात्र, नैनाबाबत प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांच्या मागण्या अन् त्यावर सिडकोसह नगरविकास विभागाची नेमकी बाजू मांडण्यास सिडकोत कुणी हक्काचा अधिकारी नव्हता. परंतु, आता निनावे यांच्या नियुक्तीमुळे ही उणीव दूर झाली आहे. ते नैनाची बाजू नक्कीच भक्कमपणे मांडून त्याचे महत्त्व पटवून देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.