अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अज्ञात तरुणाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:43 AM2018-06-23T02:43:47+5:302018-06-23T02:43:51+5:30

खोटे बोलून अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे.

Molestation of minor girl, panic of unknown youth | अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अज्ञात तरुणाची दहशत

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अज्ञात तरुणाची दहशत

Next

नवी मुंबई : खोटे बोलून अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने महिला, मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गुरुवारी संध्याकाळी घणसोली गावात ही घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या माय-लेकी घरात एकट्याच असताना ३० ते ३५ वर्षे वयाची एक व्यक्ती आली. त्याने महिलेला तिच्या पतीसोबत आपली ओळख असल्याचे सांगितले. तसेच घरासाठी भाडेकरू आणला असल्याने पतीकडून घराची चावी आणण्याचेही सुचवले. त्यानुसार सदर महिला मुलीला एकटीला घरी सोडून पतीच्या व्यवसायाच्या ठिकाणी गेली. यावेळी सदर व्यक्ती तिच्या बारा वर्षांच्या मुलीला खोटे बोलून घेवून गेला. यानंतर जबरदस्तीने तिला परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या नीलकंठ इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने त्याला प्रतिकार करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी तिला मारहाण करून घटनास्थळी सोडून सदर व्यक्तीने पळ काढला. सदर मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना दिली असता याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घणसोली सेक्टर ४ व इतर परिसरात देखील मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचे प्रकार घडत आहेत. काम सुरू असलेल्या सेंट्रल पार्कच्या भोवती बनवलेल्या जॉगिंग ट्रॅकवर जागोजागी गर्दुल्ल्यांचे अड्डे झाले आहेत.

Web Title: Molestation of minor girl, panic of unknown youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.