पनवेल-कर्जत दुहेरीकरणासाठी भूसंपादनास सापडला मुहूर्त, उपनगरीय मार्गाचे महत्त्व वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 08:11 AM2021-03-14T08:11:02+5:302021-03-14T08:12:20+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य शासनाने एमयूटीपी-३ आणि ३ अ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनानेही २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी ७४३ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

Moment found for land acquisition for Panvel-Karjat doubling | पनवेल-कर्जत दुहेरीकरणासाठी भूसंपादनास सापडला मुहूर्त, उपनगरीय मार्गाचे महत्त्व वाढणार

पनवेल-कर्जत दुहेरीकरणासाठी भूसंपादनास सापडला मुहूर्त, उपनगरीय मार्गाचे महत्त्व वाढणार

Next

नारायण जाधव -
ठाणे
: मुंबई, नवी मुंबईसह पनवेल-कजर्त परिसरात आकार घेणाऱ्या सिडकोच्या नैना क्षेत्रातील तिसऱ्या मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पनवेल-कर्जत रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनास अखेर रेल्वे विकास महामंडळास मुहूर्त सापडला आहे. यासाठी ११ मार्च २०२१ पासून पनवेल, खालापूर आणि कर्जत तालुक्यातील २५ गावांतील ३४.२० हेक्टर जमीन भूसंपादनासाठी महामंडळाने वृत्तपत्राद्वारे संबधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. (Moment found for land acquisition for Panvel-Karjat doubling)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य शासनाने एमयूटीपी-३ आणि ३ अ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनानेही २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी ७४३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या मार्गाच्या दुपदरीकरणावर दोन हजार ८८२ कोटींचा खर्च प्रस्तावित असून, जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे.

सध्या २९.१५५ किमीच्या या मार्गावर मालवाहतुकीसह एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरू आहे. परंतु, त्यावर उपनगरीय वाहतूक सुरू करायची झाल्यास मोठा खर्च अपेक्षित आहे. 

यात नवीन मार्ग टाकणे, उपनगरीय स्थानकांचा विकास, विद्युतीकरणाचे जाळे, दोन उड्डाणपूल, तीन-तीन टनेल, १३ भूमिगत मार्ग, ४५ लघू पूल, दोन आरओबी, भूसंपादनासह वनविभागाच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. एकंदरीत, या परिसराचा विकास लक्षात घेता, नजीकच्या भविष्यात या नव्या उपनगरीय मार्गास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.

माथेरान इको झोनचा अडसर
विस्तारिकरणासाठी ६५.४९ हेक्टर जमीन लागणार असून, यात ४९.०९ हेक्टर खासगी, ३.१४ हेक्टर सरकारी आणि ५.१५ हेक्टर वनजमीन लागणार आहे. यात पनवेल, चिखले, मोहपे, चौक, कजर्त ही पाच स्थानके असून, साडेतीनशेहून अधिक शेतकरी बाधित होणार आहेत. मार्गात माथेरान इको झोन येत असल्याने त्यासाठीची परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय, दोन हजारांच्या आसपास वृक्षसंपदेवर गदा येणार आहे.

कर्जतला नवे टर्मिनस बांधावे लागणार
२९.८ किमीच्या या मार्गात २४ छोटे, आठ मोठे पूल बांधावे लागणार आहेत. शिवाय, २८ अंडरपास असून नव्या मार्गासाठी कर्जत येथे स्वतंत्र टर्मिनस बांधावे लागणार आहे.

Web Title: Moment found for land acquisition for Panvel-Karjat doubling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.