शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

पनवेल-कर्जत दुहेरीकरणासाठी भूसंपादनास सापडला मुहूर्त, उपनगरीय मार्गाचे महत्त्व वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 8:11 AM

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य शासनाने एमयूटीपी-३ आणि ३ अ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनानेही २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी ७४३ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

नारायण जाधव -ठाणे : मुंबई, नवी मुंबईसह पनवेल-कजर्त परिसरात आकार घेणाऱ्या सिडकोच्या नैना क्षेत्रातील तिसऱ्या मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पनवेल-कर्जत रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनास अखेर रेल्वे विकास महामंडळास मुहूर्त सापडला आहे. यासाठी ११ मार्च २०२१ पासून पनवेल, खालापूर आणि कर्जत तालुक्यातील २५ गावांतील ३४.२० हेक्टर जमीन भूसंपादनासाठी महामंडळाने वृत्तपत्राद्वारे संबधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. (Moment found for land acquisition for Panvel-Karjat doubling)लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य शासनाने एमयूटीपी-३ आणि ३ अ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनानेही २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी ७४३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या मार्गाच्या दुपदरीकरणावर दोन हजार ८८२ कोटींचा खर्च प्रस्तावित असून, जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे.सध्या २९.१५५ किमीच्या या मार्गावर मालवाहतुकीसह एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरू आहे. परंतु, त्यावर उपनगरीय वाहतूक सुरू करायची झाल्यास मोठा खर्च अपेक्षित आहे. यात नवीन मार्ग टाकणे, उपनगरीय स्थानकांचा विकास, विद्युतीकरणाचे जाळे, दोन उड्डाणपूल, तीन-तीन टनेल, १३ भूमिगत मार्ग, ४५ लघू पूल, दोन आरओबी, भूसंपादनासह वनविभागाच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. एकंदरीत, या परिसराचा विकास लक्षात घेता, नजीकच्या भविष्यात या नव्या उपनगरीय मार्गास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.माथेरान इको झोनचा अडसरविस्तारिकरणासाठी ६५.४९ हेक्टर जमीन लागणार असून, यात ४९.०९ हेक्टर खासगी, ३.१४ हेक्टर सरकारी आणि ५.१५ हेक्टर वनजमीन लागणार आहे. यात पनवेल, चिखले, मोहपे, चौक, कजर्त ही पाच स्थानके असून, साडेतीनशेहून अधिक शेतकरी बाधित होणार आहेत. मार्गात माथेरान इको झोन येत असल्याने त्यासाठीची परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय, दोन हजारांच्या आसपास वृक्षसंपदेवर गदा येणार आहे.

कर्जतला नवे टर्मिनस बांधावे लागणार२९.८ किमीच्या या मार्गात २४ छोटे, आठ मोठे पूल बांधावे लागणार आहेत. शिवाय, २८ अंडरपास असून नव्या मार्गासाठी कर्जत येथे स्वतंत्र टर्मिनस बांधावे लागणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेlocalलोकलMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई