शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

‘ममी-पप्पा, आय हेट यू...’ पोलिसांची उडाली झोप; अभ्यासाच्या तगाद्यामुळे मुलीने सोडले घर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:35 AM

पहाटेच्या सुमारास एक फोन खणखणला आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ‘ममी-पप्पा, आय हेट यू...’अशी चिठ्ठी लिहून सातवीतली मुलगी घर सोडून गेल्याचा प्रकार मंगळवारी रात्री नेरूळमध्ये घडला. यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनीही तपासाची सूत्रे फिरवली. मुलगी मिळून न आल्याने ती कुठे गेली असेल, तिच्यासोबत काय घडले असेल, अशा अनेक प्रश्नांनी पोलिसांची झोपच उडाली. परंतु, पहाटेच्या सुमारास एक फोन खणखणला आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

नेरूळ परिसरात राहणारी व एका नामांकित शाळेत सातवीत शिकणारी मुलगी घर सोडून गेली होती. बुधवारी तिचा गणिताचा पेपर होता. त्यातून आई-वडील सतत अभ्यासाचा तगादा लावत होते. यामुळे कंटाळलेल्या या मुलीने ‘मम्मी- पप्पा, आय हेट यू...’ अशी चिठ्ठी ठेवून घर सोडले होते.हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आई-वडिलांनी नेरूळ पोलिस ठाणे गाठले. यावेळी मुलगी मिसिंग असल्याचा प्रकार गांभीर्याने घेऊन वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी तातडीने तपास पथके केली.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती रेल्वेने गेल्याचे दिसून आले. परंतु, पुढे कुठे गेली हे स्पष्ट होत नव्हते. तरीही सर्व पथकांनी नवी मुंबईसह मुंबईतल्या रेल्वे स्थानकांमध्ये, पोलिस ठाण्यांमध्ये तिच्याबद्दल चौकशी सुरू केली. बुधवारी सकाळी पोलिसांना एक फोन आला आणि त्यांनी उलवेकडे धाव घेतली. उलवे सेक्टर १९ मधील द्वारकानाथ सोसायटीच्या दोन सुरक्षारक्षकांनी तिला सुरक्षित पोलिसांच्या ताब्यात दिले.

असा झाला उलगडा

घर सोडताना सोबत आणलेल्या हजार रुपयातून तिने कोल्डड्रिंक व चॉकलेट घेतले होते. तेच खाऊन तिने उघड्यावर रात्र काढली. रात्री ती सोसायटीत येत असताना तिच्याकडे बॅग, पाण्याची बॉटल असल्याने ती इथलीच राहणारी असावी, असे समजून सुरक्षारक्षकांनी तिच्याकडे चौकशी नव्हती केली. सकाळी ती भिंतीलगत झोपलेली आढळून आल्याने त्यांनी लगेच पोलिसांना कळवले, अन् साऱ्या प्रकाराचा उलगडा होऊन सर्वांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई