पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत मोरज रिव्हरसाइड पार्क सोसायटीने मारली बाजी; आयुक्तांकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2022 07:38 PM2022-10-02T19:38:34+5:302022-10-02T19:38:46+5:30
मोरज रिव्हरसाइड पार्क सोसायटीने पर्यावरणाचा विचार करता यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
नवी मुंबई- पनवेल महानगरपालिकेने पर्यावरणपूरकगणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पनवेलमधील मोरज रिव्हरसाइड पार्क सोसायटीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शनिवारी पनवेल महानगरपालिकेचा वर्धापन दिन होता. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी मोरज रिव्हरसाइड पार्क सोसायटीमधील सदस्यांचा पारितोषिक देऊन सन्मान केला.
मोरज रिव्हरसाइड पार्क सोसायटीने पर्यावरणाचा विचार करता यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सोसायटीच्या आवारात कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि फटाके न फोडण्याचा निर्णय या सोसायटीने घेण्यात आला होता. या निर्णयाचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुकही झाले होते.