मोरबे धरण ओव्हरफ्लो; नवी मुंबईकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:03 AM2019-08-05T00:03:03+5:302019-08-05T00:03:17+5:30

पाण्याची चिंता मिटली; ९६८७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग; यंदा जलपूजनाची हॅट्रिक

Morbe Dam Overflow; Comfort for Navi Mumbai | मोरबे धरण ओव्हरफ्लो; नवी मुंबईकरांना दिलासा

मोरबे धरण ओव्हरफ्लो; नवी मुंबईकरांना दिलासा

googlenewsNext

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे महापालिकेचे मोरबे धरण रविवारी ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातील सध्याची पाण्याची पातळी ८८.२० मीटर इतकी असून धरणाचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून ९६८७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यंदा उशिरा सुरु झालेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावल्याने अल्पावधीतच धरण भरले असून यामुळे नवी मुंबईकरांना वर्षभर लागणाऱ्या पाण्याची चिंता मात्र मिटली आहे.

नवी मुंबई शहराला महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यात विजांच्या कडकडाटात सुरु वात झालेल्या पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जून महिन्यात धरण क्षेत्रात फक्त ६२ मिलीलीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाणीसाठ्याची शहराला गरज भासते. गतवर्षी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेल्या मोरबे धरणात १० सप्टेंबपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता. जून महिन्यात धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा न झाल्याने शहरात पाणीकपातीचे महापालिकेने संकेत दिले होते.

परंतु जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावल्याने धरण पूर्णपणे भरले आहे. धरण भरल्यामुळे धरणाचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले असून ९६८७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

जलपूजनाची होणार हॅट्रिक
मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात येते. २०१३ मध्ये धरण भरले होते त्यानंतर तीनवर्षे पाऊस कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. परंतु गेल्या तीन वर्षांपासून धरण क्षेत्रात होणाºया दमदार पावसामुळे धरण पूर्णपणे भरत असून यंदा जलपूजनाची हॅट्रिक होणार आहे.

Web Title: Morbe Dam Overflow; Comfort for Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.