शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

मोरबे धरण ओव्हरफ्लो; नवी मुंबईकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:03 AM

पाण्याची चिंता मिटली; ९६८७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग; यंदा जलपूजनाची हॅट्रिक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे महापालिकेचे मोरबे धरण रविवारी ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातील सध्याची पाण्याची पातळी ८८.२० मीटर इतकी असून धरणाचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून ९६८७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यंदा उशिरा सुरु झालेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावल्याने अल्पावधीतच धरण भरले असून यामुळे नवी मुंबईकरांना वर्षभर लागणाऱ्या पाण्याची चिंता मात्र मिटली आहे.नवी मुंबई शहराला महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यात विजांच्या कडकडाटात सुरु वात झालेल्या पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जून महिन्यात धरण क्षेत्रात फक्त ६२ मिलीलीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाणीसाठ्याची शहराला गरज भासते. गतवर्षी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेल्या मोरबे धरणात १० सप्टेंबपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता. जून महिन्यात धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा न झाल्याने शहरात पाणीकपातीचे महापालिकेने संकेत दिले होते.परंतु जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावल्याने धरण पूर्णपणे भरले आहे. धरण भरल्यामुळे धरणाचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले असून ९६८७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.जलपूजनाची होणार हॅट्रिकमोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात येते. २०१३ मध्ये धरण भरले होते त्यानंतर तीनवर्षे पाऊस कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. परंतु गेल्या तीन वर्षांपासून धरण क्षेत्रात होणाºया दमदार पावसामुळे धरण पूर्णपणे भरत असून यंदा जलपूजनाची हॅट्रिक होणार आहे.

टॅग्स :DamधरणNavi Mumbaiनवी मुंबई