नवी दिल्ली - सरकारने पोस्टाच्या विविध अल्पबचत योजनांच्या जुलै- सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीसाठीच्या व्याजदरात सरकारने ३० आधार अंकांपर्यंत (बीपीएस) म्हणजे ०.३ टक्क्यांपर्यंत वाढ केली. बँकांमधील विविध बचत व मुदत ठेव योजनांवरील वाढता परतावा लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, १ व २ वर्षांच्या मुदत ठेवी, ५ वर्षांच्या आवर्ती ठेवींचे व्याजदर वाढले आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा (पीपीएफ) व्याजदर मात्र ७.१ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
मात्र, सार्वजनिक भविष्य निधी अर्थात पीपीएफवरील व्याजदरात कोणतीही वाढ केलेली नाही. हा व्याजदर जैसे थे ठेवण्यात आला आहे. पीपीएफवरील व्याजदर २०२० पासून वाढविण्यात आलेला नाही. तो ७.५५ टक्के एवढा होण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना होती, याशिवाय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकासपत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरातही बदल करण्यात आलेला नाही.
तिमाहीतील असे असतील नवे दर