रेडीमेड गुढ्यांना मिळतेय अधिक पसंती

By admin | Published: April 4, 2016 02:14 AM2016-04-04T02:14:04+5:302016-04-04T02:14:04+5:30

मेट्रो सिटीतील धावपळीचे जीवन, आधुनिक जीवनशैलीमुळे गुढीसाठी मोठी काठी, नवीन कपडे, ताम्रकलश यांसारख्या गोष्टी उपलब्ध होतीलच असे नाही

More likes getting readymade garbage | रेडीमेड गुढ्यांना मिळतेय अधिक पसंती

रेडीमेड गुढ्यांना मिळतेय अधिक पसंती

Next

प्राची सोनवणे,  नवी मुंबई
मेट्रो सिटीतील धावपळीचे जीवन, आधुनिक जीवनशैलीमुळे गुढीसाठी मोठी काठी, नवीन कपडे, ताम्रकलश यांसारख्या गोष्टी उपलब्ध होतीलच असे नाही. यामुळे रेडीमेड गुढ्या हा पर्याय बाजारात उपलब्ध असून याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शहरातील बचत गटांच्या महिलांनी गेल्या काही महिन्यांपासून या लहान गुढ्या तयार करण्यास सुरुवात केली आहे. या गुढ्यांना मागणी असल्याचे पाहायला मिळाले.
या गुढ्यांमध्ये मिनी आण जम्बो असे दोन प्रकार असल्यामुळे कोणी हौसेखातर तर कोणी पूजनासाठी या गुढ्यांची खरेदी करीत होते. यात लहान आकरातील गुढी ३० ते १०० रु पयांपर्यंत तसेच मोठ्या आकारातील गुढी ७० रुपयांपासून ते ३५० रु पयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कापड, लाकूड आणि मेण यांचा वापर करून तयार केलेल्या छोट्या आकारातील रेडीमेड गुढ्या वाशीतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये तसेच शहरातील दुकानांमध्ये आणि मॉल्समध्ये विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. प्लास्टिकच्या वाटीमध्ये मेण टाकून छोठ्या काठीवर सोवळ्याचे वस्त्र, साखरगाठींचा कृत्रिम कलात्मक हार, तांब्या, कडुनिंबाची कृत्रिम पाने आदींचा वापर करून तयार केलेली छोटीशी गुढी लक्ष वेधून घेत आहे. काही ठिकाणी लाकूड, प्लास्टर आॅफ पॅरिसचा पृष्ठभाग वापरून त्यावर केलेल्या रेडीमेड गुढ्या विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. सध्या फ्लॅट संस्कृतीमध्ये गुढीसाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे घरातील देव्हाऱ्यामध्ये, मोटारीत तसेच कार्यालयातही ठेवता येतील अशा या छोट्या गुढ्यांना चांगली पसंती मिळते आहे.

Web Title: More likes getting readymade garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.