डीआयजींना जाणीवपूर्वक फसविण्याचा प्रयत्न, मोरेंच्या पत्नीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:49 AM2020-01-11T04:49:36+5:302020-01-11T04:49:43+5:30

डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप लावलेली अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे.

Moren's wife accused of deliberately trying to trick DIG | डीआयजींना जाणीवपूर्वक फसविण्याचा प्रयत्न, मोरेंच्या पत्नीचा आरोप

डीआयजींना जाणीवपूर्वक फसविण्याचा प्रयत्न, मोरेंच्या पत्नीचा आरोप

Next

पनवेल : डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप लावलेली अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असलेली सुसाइड नोट ठेवून ती घरातून गेली होती. मात्र, आता एका रेल्वे स्थानकावर ती नातेवाइकाबरोबर प्रवास करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. हा संदर्भ देत या प्रकरणात डीआयजींना जाणिवपूर्वक गोवण्यात आल्याचा आरोप निशिकांत मोरेंच्या पत्नीने केला आहे.
अल्पवयीन मुलगी आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर उत्तर प्रदेशला गेल्याचे गुरुवारी पोलिसांना सीसीटीव्हीतून कळाले आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने यात मोरे यांचा कोणताही हात नसल्याचे त्यांच्या पत्नीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डीआयजी मोरे यांना नाहक बदनाम केले जात असून, त्यांच्यावर खोटी विनयभंगाची केस करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी स्वत: आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर गेल्याने तिला गायब करून यात निशिकांत मोरे यांना फसविण्याचा कट मुलीच्या वडिलांनी केला असल्याचा आरोप निशिकांत मोरे यांनीही केला होता.
मुलीच्या वडिलांकडे असलेले आपले पैसे परत मागितले असता विनयभंगाची तक्रार केल्याचा खुलासा मोरे यांच्या पत्नीने केला आहे. तसेच मोरे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>पैसे मागितल्याने तक्रार
मुलीच्या वडिलांकडे असलेले आपले पैसे परत मागितले असता विनयभंगाची तक्रार केल्याचा खुलासा मोरे यांच्या पत्नीने केला आहे.

Web Title: Moren's wife accused of deliberately trying to trick DIG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.