नवी मुंबई शहरातील खारफुटीवर डेब्रिजचे डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:22 AM2018-06-15T05:22:09+5:302018-06-15T05:22:09+5:30
स्वच्छ व सुंदर शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहराला आता डेब्रिजमाफियांनी आव्हान दिले आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीवर राजरोसपणे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या आहेत.
- अनंत पाटील
नवी मुंबई - स्वच्छ व सुंदर शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहराला आता डेब्रिजमाफियांनी आव्हान दिले आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीवर राजरोसपणे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर काही ठिकाणी डेब्रिजचे डोंगर तयार झाले आहेत. एकूणच डेब्रिजमाफियांनी स्वच्छ शहराला आव्हान निर्माण केले आहे.
घणसोलीतील पामबीच मार्ग, ऐरोली सेक्टर १0, व कोपरखैरणे येथील खाडी किनाºयावरील खारफुटींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या ठिकाणी टप्प्याटप्प्यावर डेब्रिजचे ढीग दिसून येतात. काही ठिकाणी तर डेब्रिजचे डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे खारफुटी संपुष्टात आली आहे. खारफुटीच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जातात. परंतु प्रभावी अंमलबजावणीअभावी त्या फोल ठरल्या आहेत. त्याचाच फायदा डेब्रिजमाफियांनी घेतला आहे. महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जोरदार जनजागृती केली जात आहे. कचºयाचे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. परंतु डेब्रिजमाफियांना आवर घालण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.
खारफुटीच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा डेब्रिज टाकू नये, अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत डेब्रिजमाफियांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्याचे दिसून येते. कारण अनेक ठिकाणी या फलकांच्या बाजूलाच डेब्रिजचे ढीग दिसून येतात. नवी मुंबई महापलिकेच्या परिमंडळ दोनमध्ये कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या परिसराचा समावेश आहे. या चारही विभागात डेब्रिजची समस्या गंभीर असून डेब्रिज भरारी पथकाने गेल्या सहा महिन्यात ३४ ट्रक जप्त करून ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूणच डेब्रिजमाफियांना आवर घालण्यास भरारी पथकाला फारसे यश मिळाले नाही. या पथकाच्या कामगिरीला मर्यादा असल्या तरी स्थानिक नगरसेवक, पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिकांनी पुढाकार घेवून खारफुटीचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे.
डेब्रिज आणि मातीचा भराव टाकणाºया वाहतूकदारांवर महापालिकेच्या भरारी पथकामार्फत वेळोवेळी कारवाई केली जाते. मोकळ्या जागेवर किंवा खारफुटीवर डेब्रिज किंवा माती टाकणाºयांवर नियमित कारवाई केली जाते. त्यासाठी डेब्रिज भरारी पथकासोबत महापालिका कर्मचारी कंत्राटी सुरक्षारक्षक, असा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे.
- मनोहर गांगुर्डे, अधीक्षक,
घनकचरा व्यवस्थापन महापालिका.
कारवाईचा तपशील
विभाग वाहने दंड (रु पये)
दिघा 0४ ७५000
ऐरोली 0७ २,२०,०००
घणसोली १६ ४,५५,०००
कोपरखैरणे 0७ १,५०,०००