शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

नवी मुंबई शहरातील खारफुटीवर डेब्रिजचे डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:22 AM

स्वच्छ व सुंदर शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहराला आता डेब्रिजमाफियांनी आव्हान दिले आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीवर राजरोसपणे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या आहेत.

- अनंत पाटीलनवी मुंबई  - स्वच्छ व सुंदर शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहराला आता डेब्रिजमाफियांनी आव्हान दिले आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीवर राजरोसपणे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर काही ठिकाणी डेब्रिजचे डोंगर तयार झाले आहेत. एकूणच डेब्रिजमाफियांनी स्वच्छ शहराला आव्हान निर्माण केले आहे.घणसोलीतील पामबीच मार्ग, ऐरोली सेक्टर १0, व कोपरखैरणे येथील खाडी किनाºयावरील खारफुटींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या ठिकाणी टप्प्याटप्प्यावर डेब्रिजचे ढीग दिसून येतात. काही ठिकाणी तर डेब्रिजचे डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे खारफुटी संपुष्टात आली आहे. खारफुटीच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जातात. परंतु प्रभावी अंमलबजावणीअभावी त्या फोल ठरल्या आहेत. त्याचाच फायदा डेब्रिजमाफियांनी घेतला आहे. महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जोरदार जनजागृती केली जात आहे. कचºयाचे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. परंतु डेब्रिजमाफियांना आवर घालण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.खारफुटीच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा डेब्रिज टाकू नये, अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत डेब्रिजमाफियांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्याचे दिसून येते. कारण अनेक ठिकाणी या फलकांच्या बाजूलाच डेब्रिजचे ढीग दिसून येतात. नवी मुंबई महापलिकेच्या परिमंडळ दोनमध्ये कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या परिसराचा समावेश आहे. या चारही विभागात डेब्रिजची समस्या गंभीर असून डेब्रिज भरारी पथकाने गेल्या सहा महिन्यात ३४ ट्रक जप्त करून ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूणच डेब्रिजमाफियांना आवर घालण्यास भरारी पथकाला फारसे यश मिळाले नाही. या पथकाच्या कामगिरीला मर्यादा असल्या तरी स्थानिक नगरसेवक, पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिकांनी पुढाकार घेवून खारफुटीचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे.डेब्रिज आणि मातीचा भराव टाकणाºया वाहतूकदारांवर महापालिकेच्या भरारी पथकामार्फत वेळोवेळी कारवाई केली जाते. मोकळ्या जागेवर किंवा खारफुटीवर डेब्रिज किंवा माती टाकणाºयांवर नियमित कारवाई केली जाते. त्यासाठी डेब्रिज भरारी पथकासोबत महापालिका कर्मचारी कंत्राटी सुरक्षारक्षक, असा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे.- मनोहर गांगुर्डे, अधीक्षक,घनकचरा व्यवस्थापन महापालिका.कारवाईचा तपशीलविभाग वाहने दंड (रु पये)दिघा 0४ ७५000ऐरोली 0७ २,२०,०००घणसोली १६ ४,५५,०००कोपरखैरणे 0७ १,५०,०००

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या