बौद्धविहारवरील कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन

By admin | Published: February 17, 2017 02:22 AM2017-02-17T02:22:56+5:302017-02-17T02:22:56+5:30

सिडकोने अनधिकृत बांधकामाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत विविध नोडमध्ये कारवाई सुरू असून स्थानिकांच्या

Movement against the protest against Buddhist behavior | बौद्धविहारवरील कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन

बौद्धविहारवरील कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन

Next

पनवेल : सिडकोने अनधिकृत बांधकामाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत विविध नोडमध्ये कारवाई सुरू असून स्थानिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. बुधवारी अनधिकृतपणे बांधण्यात आलेले खारघर गावातील बौद्धविहार जमीनदोस्त करण्यात आले. मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत खारघरमधील सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन विरोध केला. शिवाय कारवाईच्या घटनेच्या निषधार्थ गुरुवारी सिडकोवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. गावठाण हद्दीत सिडकोने अद्यापही २०० मीटरची परिसीमा निश्चित केली नसल्याने परिसरातील गावांतून सिडकोच्या कारवाईला मोठा विरोध होत आहे.
अतिक्रमण विरोधी कारवाई हा सिडकोच्या कारवाईचा एक भाग आहे. मात्र ऐन परिक्षांच्या काळात घरांवर, गृहसंकुलांवर कारवाई करण्यात येत असल्याने, जायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको २००९ नंतरची सर्व धार्मिक स्थळे पाडणार असल्याचे सांगते. मात्र नवी मुंबई वसविताना अनेक गावांमध्ये ग्रामदेवतेची स्थापन करण्यात आली. त्यांची कागदोपत्री माहिती उपलब्ध नसली तरी गुगल मॅपवर अशी मंदिरं स्पष्टपणे दिसतात. तरी देखील त्यांना नोटीसा धाडल्या जात असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे सिडकोने गरजेपोटी घरासंदर्भात काही घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही कोणती ठोस भूमिका न घेता प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई केली जात आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांसह सर्वच घटकामध्ये मोठी नाराजी आहे. खारघर गावातील लुबिनी बौद्धविहार हे गावठाणापासून अवघे काही मीटर अंतरावर आहे. शिवाय कांबळे कुटुंब हे प्रकल्पग्रस्त असताना सिडकोने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
गावठाणापासून २०० मीटरची सीमा निश्चित केल्याशिवाय सिडकोने या बांधकामावर कारवाई करू नये, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे . खारघर शहरामध्ये या कारवाईचे तीव्र पडसाद पहावयास मिळाले. जवळ जवळ ८० टक्के दुकाने गुरुवारी बंद होती. सिडको भवनावर काढलेल्या या सर्वपक्षीय मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये आमदार बाळाराम पाटील यांच्यासह या वेळी शेकापचे माजी उपसरपंच संजय घरत, गुरु नाथ गायकर, आरपीआयचे नरेश जाधव, कल्पेश तोडकर, सुशील महाडिक, राजाराम पाटील, भाजपाचे ब्रिजेश पटेल, लीना गरड, बिना गोगरी, मिलिंद ठोकळे, सुरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, अभिमन्यू पाटील, कीर्ती नवघरे आदी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Movement against the protest against Buddhist behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.