लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांतील रिक्त पदांच्या जागेवर, हजारो कंत्राटी कामगार गेली अनेक वर्षे काम करत असून, त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. परिणामी मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी ८ मे रोजी राज्यातील सर्व वीजनिर्मिती केंद्रे, कार्यालये आणि महापारेषण कंपनीच्या सर्व ग्रहणकेंद्रे, उपकेंद्रे आणि महावितरण कंपनीचे सर्व सर्कल, झोन कार्यालयाच्या समोर आंदोलन छेडण्यात येणार आहे. तिन्ही कंपन्यांतील कंत्राटी कामगारांना ऊर्जामंत्र्यांनी नेमलेल्या रानडे समितीच्या अहवालानुसार पूर्वाश्रमीच्या विद्युत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे कामावर घेण्यात यावे आणि शाश्वत रोजगाराची हमी द्यावी. तिन्ही कंपन्यांनी वेतनविषयक काढलेल्या परिपत्रकाचे परिपालन संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार करीत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत.
वीज कामगार करणार आंदोलन
By admin | Published: May 09, 2017 1:34 AM