नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मोकळ्या जागेवर माल ठेवणा-यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. सुरक्षारक्षकांनी अपशब्द वापरल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी आंदोलन सुरू केले व अर्धा दिवस मार्केट बंद ठेवले. वरिष्ठ अधिकाºयांनी मध्यस्ती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही दिवसांपासून कृषिमालाची आवक प्रचंड वाढली आहे. मागणीपेक्षा दुप्पट माल विक्रीसाठी येऊ लागला आहे. मंगळवारी तब्बल १३२ ट्रक, टेम्पो कांदा, ७७ वाहनांमधून बटाटा व ११ वाहनांमधून लसून विक्रीसाठी आली आहे. रोज २०० पेक्षा जास्त वाहनांची आवक होऊ लागली असून, विक्रीसाठी आलेला माल ठेवायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जुना व नवीन दोन्ही प्रकारचा कांदा विक्रीसाठी येत आहे. जागा नसल्यामुळे हा माल मोकळ्या पॅसेजमध्ये ठेवला जात आहे. नियमाप्रमाणे माल मोकळ्या पॅसेजमध्ये ठेवता येत नसल्यामुळे काही जणांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मोकळ्या पॅसेजमधून चालता येत नसल्यामुळे कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने उपसचिवांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या होता. कारवाईदरम्यान व्यापारी व बाजार समितीच्या सुरक्षारक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. संतापलेल्या व्यापाºयांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. गाळ्यांची शटर खाली ओढण्यास सुरुवात केली. मार्केटमधील सर्व व्यवहार ठप्प झाले. कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाच्या कार्यालयामध्ये व्यापाºयांनी बैठक घेऊन अपशब्द वापरणाºयांचा निषेध केला. शेतकºयांच्या मालाला ग्राहक मिळेनासे झाले आहेत. राज्यात कुठेच जुना कांदा विकला जात नाही, यामुळे शेतकरी तो माल मुंबईला पाठवत आहेत. माल ठेवण्यासाठीही जागा नसल्यामुळे खुल्या पॅसेजमध्ये ठेवण्यात येत आहे. प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई सुरू केली असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.व्यापाºयांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सहसचिव अविनाश देशपांडे, उपसचिव आय. आर. मसाराम यांनी अडत व्यापारी संघात जाऊन व्यापाºयांबरोबर चर्चा केली. मार्केटमधील समस्या सोडविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली. मार्केटमध्ये वाहने उभी करण्याबरोबर इतर समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. देशपांडे यांनी व्यापाºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. या बैठकीला व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, माजी संचालक अशोक वाळूंज, राजिव मणियार, भरत मोरे, सुरेश शिंदे व इतर सर्व व्यापारी उपस्थित होते. व्यापाºयांची भावना लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांनही दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा वाद मिटला.>सहसचिवांमुळे वाद मिटलाकांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाºयांनी व्यापार बंद करून प्रशासनाचा निषेध केला. यामुळे मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. बंदमुळे नुकसान अजून वाढण्याची शक्यता होती. बाजार समितीचे सहसचिव अविनाश देशपांडे यांनी प्रसंगावधान राखून व्यापाºयांची समजूत घातली व त्यांच्या आवाहनानंतर व्यापाºयांनी बंद मागे घेतला व शेतकºयांचे मोठे नुकसान टळले.>बाजार समितीमध्ये कांदा-बटाट्याची आवक प्रचंड वाढली आहे. येणारा माल ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही, यामुळे काही माल पॅसेजमध्ये ठेवला जात आहे. या मालावर प्रशासनाने कारवाई केली व सुरक्षारक्षकांनी अपशब्द वापरल्यामुळे मार्केट काही वेळ बंद ठेवले होते.- राजेंद्र शेळके,अध्यक्ष,कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ>एपीएमसीमध्ये कांदा व बटाट्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. रोज २०० पेक्षा जास्त गाड्यांमधून कृषिमाल विक्रीसाठी येत असून, तो ठेवण्यासाठी जागा मिळेना झाली आहे. लिलावगृहासह गाळ्यांच्या बाहेर ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेवर गोण्या ठेवल्या जात आहेत. संपूर्ण मार्केट कांदामय झाले आहे. बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये असून या मालावर कारवाई करून प्रशासनाने शेतकºयांचे नुकसान करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 12:59 AM