खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन 

By नामदेव मोरे | Published: January 15, 2024 05:03 PM2024-01-15T17:03:02+5:302024-01-15T17:03:20+5:30

प्रत्येक रविवारी एक तास शांततेने निषेध केला जात असून यासाठी न्यायालयीन लढाही सुरू केला आहे.

Movement to prevent degradation of coastal environment Residents protest against tree felling | खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन 

खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन 

नवी मुंबई - ठाणे खाडीच्या क्षेत्रामधील नवी मुंबई, उरण परिसरामध्ये चार पाणथळ क्षेत्र असून त्यांनी जवळपास १९४ हेक्टर भुभाग व्यापला आहे. यामधील टीएस चाणक्य व एनआरआय पाणथळ परिसरामध्ये खारफुटी तोडून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. यामुळे फ्लेमींगोसह १६७ पक्षांचा व शेकडो समुद्री जीवांचा आदिवास धोक्यात आला आहे. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या वृक्षतोडीविरोधात जनआंदोलन सुरू केले आहे. प्रत्येक रविवारी एक तास शांततेने निषेध केला जात असून यासाठी न्यायालयीन लढाही सुरू केला आहे.

             शासनाने ठाणे खाडी परिसरामध्ये फ्लेमींगो अभयारण्य घोषीत केले आहे. ऐरोली ते बेलापूर व उरण परिसरातील खाडीकिनारा पर्यावरणासाठी महत्वाचा आहे. या विभागात टी. एस. चाणक्य, एनआरआय, पानजे, बेलपाडा ही चार पाणथळ क्षेत्र आहेत. या ठिकाणी प्रत्येक वर्षी हजारो फ्लेमींगो वास्तव्यासाठी येतात. याशिवाय सर्व प्रकारचे १६७ पक्षी या परिसरात आढळतात. याशिवाय मासे, समुद्री किटक व इतर २५३ प्रकारचे जीवजंतू आढळतात. खाडीकिनाऱ्यावरील ही जैवविविधता टिकविण्यासाठी खारफुटीच्या जंगलाचे रक्षण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली व समाज कंटकांकडून खारफुटीचे नुकसान केले जात आहे. टी. एस. चाणक्य जवळ खारफुटीची जवळपास १२५ पेक्षा जास्त मोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत. उरलेले वृक्षही तोडण्याचे षडयंत्र सुूरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शहरातील पर्यावरण प्रेमी एकवटले असून त्यांनी वृक्षतोडीविरोधात लढा सुरू केला आहे.

             पर्यावरण प्रेमी नागरिक प्रत्येक रविवारी टी. एस. चाणक्य परिसरात एकत्र येत असून शांततेच्या मार्गाने वृक्षतोडीच्या घटनेचा निषेध नोंदवत आहेत. वृक्षतोड करणारांवर कारवाई करण्यात यावी. पाणथळ क्षेत्राचे रक्षण करावे. जैवविविधता टिकविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे. या आंदोलनाला नागरिकांचा प्रतीसाद वाढत आहे. प्रत्येक रविवारी निषेध नाेंदविण्यासाठी येणारांची संख्या वाढत आहे. या आंदोलनाला जनचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असून यासाठी देशभरातील पर्यावरण प्रेमींचा पाठिंबा मिळविण्यात येणार आहे.
प्रतीक्रिया

टी. एस. चाणक्य, एनआरआय वसाहत व डीपीएस शाळेजवळ प्रत्येक वर्षी हजारो फ्लेमींगो पक्षी येतात. इतर शेकडो प्रकारचे पक्षी येथे येत असतात. या परिसरातील खारफुटी तोडली जात आहे. खारफुटी तोडणारांवर कारवाई करावी व पाणथळ परिसराचे रक्षण करावे यासाठी प्रत्येक रविवारी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जात आहे.
सुनील अग्रवाल, पर्यावरण प्रेमी
चौकट

पाणथळ क्षेत्राचा तपशील

ठिकाण - क्षेत्रफळ

टी एस चाणक्य - १३ हेक्टर

एनआरआय - १९ हेक्टर

पानजे - १२४ हेक्टर

बेलपाडा - ३० हेक्टर

भेंडखळ - ८ हेक्टर

चौकट
खाडी परिसरातील जैविविधता
प्रकार - संख्या

खारफुटीच्या मुख्य प्रजाती - १२

खारफुटीच्या इतर प्रजाती - ३७
पक्षी - १६७

मासे -४५
पुलपाखरे - ५९

समुद्री जीवजंतू - ६७
इतर सुक्ष्म जीव - ८२

Web Title: Movement to prevent degradation of coastal environment Residents protest against tree felling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.